सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर ता. १५ श्री सुदर्शन चक्राचा मंत्रघोष व अंबे माता की जय... सप्तशृंगी माते की जय" च्या जयघोषात आज शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या श्री सुदर्शन चक्र महायागास उत्साहात प्रारंभ झाला आहे सह्याद्रीच्या सात डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सव सोमवारपासून (ता. १०) प्रारंभ झाला आहे. वर्षभरात येणाऱ्या चार नवरात्रापैकी चैत्र नवरात्री व अश्विन नवरात्री हे प्रमुख दोन नवरात्रोत्सव सप्तशृंगीगडावर लाखो भाविकांच्या उपस्थित साजरे केले जातात. दरम्यान विश्ववशांती, विश्वकल्याण व कोराना महामारीचे संकटाचे निर्वाहन व्हावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी व संतांनी सांगितल्याप्रमाणे हे विश्वची माझे घर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासातर्फे आज (ता. १५) पासून त्रिदिवशीय "श्री सुदर्शन चक्र" यागास प्रारंभ करण्यात आला आहे. आज सकाळी शिवालय तलावावर प्रायश्चित संकल्प सोडला जावून यजमांनाना विडा सुपारी देत सुदर्शन यागाची पूजा विधीस प्रारंभ करण्यात आला. देवी मंदिरास व यज्ञमंडपास फळ व फुलांच्या माळांची आरास करुन सभामंड फुल पाकळ्या व रोंगाळीच्या साहयाने यत्र कुंड सजविण्यात आला होता. पुरोहित संघाच्या २५ पुरोहितांनी मंगलमय वातावरणात श्री. सुदर्शन चक्र यागास आदिमायेची आराधना करीत मंगलमय मंत्रघोषात प्रारंभ करण्यात आला. न्यासाच्या अधिकाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवादरम्यान श्री भगवतीची पंचामृत महापूजा बरोबरच शांतीपाठ, रुद्रपाठ, देविस्तुत्य यांचे पाठ व पठणही होणार आहेत.
नवरात्रोत्सवाची सांगता व यागास पूर्णांहूती सोमवारी शाकंभरी पौर्णिमेस होणार आहे. दरम्यान आज दिवसभरात कोविड नियमावलींचे पालन करीत दहा हजारावर भाविकांनी शाकंभरी नवरोत्सवानिमित्त दर्शन घेतले. उद्या रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने भाविक मोठ्या संख्येने देवी दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त नाशिक येथील विशाल पाटील भाविकांतर्फे एक हजार किलोच्या निर्यातक्षम दर्जाचे अननस, पेरु, संत्री, मोसंबी, पेरु, द्राक्ष कलिंगड, पपई, डाळींब, नारळ, खरबूज, सफरचंद, अपल बोर, केळी आदी १४ प्रकारच्या फळाची मंदिरात आकर्षक आरास करण्यात आली होती. ही आरास करण्यासाठी संपूर्ण एक दिवस लागला असून आरासासाठी वापरण्यात आले. फळांचे भाविकांना सुदर्शन यंत्र यागास पुर्णाहती दिल्यानंतर प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर प्रमुख नारद अहिरे यांनी दिली.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....