सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज रोजी उपसरपंच पदाची निकणुक करण्यासाठी विशेष सभा आज सकाळी १०.०० वा. आयोजित करण्यात आली होती उपसरपंच पदाची निकणुक करणेसाठी विशेष सभा ग्रामपंचायत सरपंच श्री रमेश शंकर पवार यांच्या अध्यक्षते खालील संपन्न झाला. यासाठी सौ. जयश्री गायकवाड, कल्पना बर्डे, राजेश गवळी, दत्तू बर्डे, सुवर्ण पवार, संदीप बेनके, मनीषा गवळी, व बेबीबाई जाधव हे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच निवडणुक नियम १९६४ चे नियम ६ अन्वये उपसरपंच परासाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त करून घेण्यात आले यात एकमेव उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त असल्यामुळे माघार घेण्याची आवश्यकताच भासली नाही त्या अनुषंगाने उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली ग्रामपंचायत एकूण ९ सदस्यांनी एक मताने उपसरपंच पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जानुसार श्री संदीप शशिकांत बेनके यांना एक मताने उपसरपंच पदा निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
तदनंतर ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री संदीप शशिकांत बेनके यांची निवड झाल्याने संपूर्ण ग्रामस्थांनी एक जल्लोष करत फटाक्याची आतिषबाजी करून गावात मिरवणूक काढण्यात आली तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री अजय दुबे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या तसेच समस्त ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत यावेळी संदीप बेनके यांचा सत्कार करण्यात आला.
- राज रघुवीर जोशी….