सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
कृषी मंत्री दादा भुसे यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो यासाठी सप्तश्रृंगी देवीला ५६ लिटर दुधाचा अभिषक...
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड वर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभोयासाठी ग्रामपंचायत सप्तश्रृंगी गडाचे माजी उपसरपंच व शिवसेना उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी व ग्रा. प. सदस्य राजेश गवळी यांचेवतीने आई सप्तशृंगीला ५६ लिटर दुधाचा अभिषेक करुन आरती करण्यात आली व महापूजा झाल्यानंतर संपूर्ण भाविकांना आई भगवतीचा प्रसाद म्हणजेच बुंदीचे लाडूचे वाटप करण्यात आले.
आरतीनंतर उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदिमाया श्री सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, ग्रा. प. सदस्य राजेश गवळी, शांताराम गवळी, दीपक जोरवर, नवनाथ बेनके, राजू शिंदे, अजय दुबे, सागर भुसणर, दत्तू बर्डे, देवीचे पुजारी मिलिंद दीक्षित, प्रसाद दीक्षित, उमाकांत दीक्षित, भागेश दीक्षित, विनोद दीक्षित, मिलिंद दीक्षित, मंदिर विभाग प्रमुख नारद आहिरे, सहाय्यक विश्वनाथ बर्डे आदिंसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व भाविक उपस्थित होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कृषीमंत्री दादा भुसे व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सप्तश्रृंगी देवीच्या गडावर ग्रामस्थ व भाविकांसाठी विविध योजनेतून अनेक विकास कामे पुर्ण तर नविन कामे मंजुर झाले आहेत व काही कांमाचा पाठपुरावा सुरु आहे . या विकास कामांसाठी वनविभागाकडुन दहा एकर जागाही गवळी बंधूंनी सातत्याने पाठपुरावा करुन मंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळविली आहे त्यामुळे सप्तश्रृंगी गड ग्रामस्थ व भाविकांनी श्री भुसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्यासाठी देवी कडे प्रार्थना केली .
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....