सप्तशृंग गड | श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल संदर्भिय पुर्ततेनंतर भाविकांसाठी श्री भगवती मंदिर हे सोमवार, दि. २६/०९/२०२२ आश्विन शु. १ घटस्थापना पासून दर्शनासाठी खुले होणार...!

0
 सप्तशृंग गड/माय मराठी एक्सप्रेस


       साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री भगवती अर्थात सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाच्या संवर्धनासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने वर्ष २०१४ पासून प्रयत्न सुरू केले होते. त्याअंतर्गत श्री भगवती स्वरुप / मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने विश्वस्त संस्थेच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय आणि त्यासंबंधित नियोजन सुरू केले. वेळोवेळी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय. आय. टी, पवई, (बॉम्बे) यांसह पुरातत्व विभागाच्या मार्फत अधिकृत असलेल्या में. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत केलेले प्रत्यक्ष निरीक्षणे आणि अहवाला नुसार जिल्हा प्रशासनाशी योग्य ती चर्चा विनिमय व समन्वय साधून अंतिम निर्णयासह दि. २१/०७/२०२२ पासून विश्वस्त संस्थेच्या वतीने श्री भगवती मूर्ती / स्वरुप संवर्धन व देखभाल प्रक्रियेचे काम प्रत्यक्षात सर्व धार्मिक पूजा विधीच्या पूर्ततेनंतर सुरु करण्यात आले. तज्ञांच्या मार्गदर्शन व प्रत्यक्ष उपस्थितीत श्री भगवती स्वरूप / मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग (कवच) हा धार्मिक व शास्त्रोक्त पध्दतीने काढण्यात आला, आणि त्यामागे श्री सप्तशृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली.

              वर्षानुवर्षे श्री भगवतीच्या स्वरूपावर धार्मिक विधी व पंचामृत अभिषेक दरम्यान केलेल्या शेंदूर लेपनाच्या मागे आढळून आलेले श्री भगवतीचे अतिप्राचीन, विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी दि. १०/०९/२०२२ पासून पितृपक्ष सुरू होत असल्यामुळे शास्त्रानुसार सद्यस्थितीत भाविकांना लवकरात लवकर श्री भगवतीचे दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही आवश्यक धार्मिक विधी पूर्ण होणे आवश्यक आहेत, म्हणून संस्थान चे वतीने पितृपक्षापूर्वी आवश्यक ते सर्व धार्मिक पूजाविधी दि.०६ ते दि. ०८ सप्टेंबर २०२२ दरम्यान पूर्ण करून शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवार, दि. २६/०९/२०२२ रोजी श्री भगवती मंदिर हे भाविकांना श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्याचे नियोजन ट्रस्ट चे वतीने करण्यात आले आहे, त्या साठी विविध धार्मिक पीठातील विद्वान तसेच श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पं गणेश्वरशास्त्री द्रविड , श्री क्षेत्र नाशिक येथील स्मार्त चूडामणि पं शांताराम शास्त्री भानोसे, व श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहित संघाच्या मार्गदर्शना प्रमाणे हे सर्व धार्मिक विधी निर्धारित केलेले आहेत, दरम्यान मंगळवार, दि. ०६/०९/२०२२ ते गुरुवार, दि. ०८/०९/२०२२ दरम्यान पूर्व नियोजना प्रमाणे श्री भगवती मंदिरात सहस्त्र कलश महास्नपन विधि, संप्रोक्षण विधी, उदक शांति, शांतिहोम, इत्यादी धार्मिक पूजा विधींचे आयोजन महाराष्ट्रातील तज्ञ पुरोहितां कडून करण्यात येणार आहे, आणि संपूर्ण पितृपक्षात १६०० देवीअथर्वशीर्ष पाठांचेअनुष्ठान भगवतीचे सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रापूर्वीसंपन्न होणार आहेत, व त्यानंतर सर्व भाविकांना श्री भगवती मंदिर सोमवार दि. २६/०९/२०२२ आश्विन शु. १ घटस्थापना पासून दर्शनासाठी खुले होणार आहे ,यांची सर्वांनी नोंद घेवून ट्रस्ट व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे. अशी माहिती तसेच नम्र आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !