वणी/माय मराठी एक्सप्रेस
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला आणि वाणिज्य महाविद्यालय वणी, येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विकास मंडळ यांच्या अंतर्गत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याच प्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या करीता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना तिरंग्याचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर वणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करीता शुभेच्छा दिल्या. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. ज्या स्वातंत्र सैनिकांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी योगदान दिले त्यांना आदरांजली म्हणून हर घर तिरंगा या द्वारे त्यांना अभिवादन करण्याकरिता सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे या प्रसंगी त्यांनी आव्हान केले. तसेच वणी पोलीस स्टेशन यांनी देखील सहभागृ नोंदविला. या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष मा.श्री. नरहरी झिरवळ उपस्थित होते तसेच नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे एस. पी. श्री सचिन पाटील, श्री श्रीरामजी शेटे, वणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. स्वप्निल राजपूत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी वणी परिसरातील शाळांचे विद्यार्थी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग या रॅलीमध्ये नोंदविला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके, डॉ. आर डी घोलप, डॉ. के आर आढाव, डॉ. डी डी वाळके, प्रा.सचिन लोखंडे, प्रा.अजित मेधणे, प्रा. रवींद्र चव्हाण राष्ट्रीय सेवा कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय गायकवाड राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सूरजकुमार एस प्रसाद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एस बी गायकवाड सर्व वृंद व शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….