साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिनांक २१.०७.२०२२ पासून आई सप्तशृंगीचे म्हणजेच श्री भगवतीचे मंदिर हे मूर्ती संवर्धन कामानिमित्त बंद करण्यात आले असून, मूर्ती संवर्धनासह गाभाऱ्यातील काम हे तात्काळ सुरुवात करण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू असताना सुद्धा श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर पर्यटकांची संख्या व पर्यावरण प्रेमींची संख्या ही वाढलेली दिसून येत आहे सप्तशृंगी देवीचे मंदिर जरी बंद आहे तरी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत भाविकांकरिता सुख सुविधा या नियमित सुरू आहेत जसे की पहिली पायरी येथे पर्यायी दर्शन व्यवस्था म्हणून श्री भगवतीची प्रतिकात्मक मूर्ती ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर आई भगवतीचा प्रसाद घेण्याकरिता अन्नपूर्णा प्रसादालय, भाविकांना राहण्याकरिता असलेली सोय म्हणजेच भक्तनिवास आदींसह इतर सुख सुविधा देवी संस्थान मार्फत पूर्वीप्रमाणेच कार्यरत आहेत व या सुविधा कार्यरत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढतांना दिसून येत आहे.
29 जुलैपासून पासून सुरू झालेल्या श्रावण महिन्यामुळे व श्रावणाच्या सरींमुळे व श्रावण महिना हा धार्मिक महिना असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील हेमाडपंथी शिवमंदिर व शिवालय तलाव एक अद्भुत स्वरूप आल्याचे दिसून येत आहे व हे स्वरूप दिसून येत असल्यामुळे भाविकांची संख्या ही महादेवाच्या दर्शनासाठी व या पावन महिन्याच्या पावन तीर्थामध्ये म्हणजेच शिवालय तलावामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे त्याचबरोबर समोरील मार्कंडेय ऋषी पर्वत व सप्तशृंग गडावरील सप्तशिखर आणि गडावरील पसरलेली हिरवळ ही पर्यटन प्रेमींना भुरळ घालताना दिसून येत आहे डोंगर व डोंगर परिसरातील हिरवाळीमुळे सप्तशृंग गडावरील हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी हजारो भाविक हे सप्तशृंग गडावरती निसर्गाच्या सानिध्यात येत असल्याची माहिती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऑड श्री ललित निकम यांनी दिली.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….