सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
महाराष्ट्र राज्यातील आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथील श्री भगवती स्वरूप/ मूर्ती संवर्धन व देखभालीच्या कामाची विधिवत पूजा दिनांक 20/07/2022 रोजी श्री भगवतीच्या मंदिरात मा. अध्यक्ष श्री वर्धन पी देसाई यांच्या हस्ते आई सप्तशृंगीची सकाळी 7 ते 10 च्या सुमारास महापूजा संपन्न झाली या पूजेदरम्यान अध्यक्ष श्री वर्धन पी. देसाई सहकुटुंब उपस्थित होते व त्यानंतर विश्वस्त श्री भूषणराज तळेकर यांच्या हस्ते देवी अथर्वशीर्ष, आदभूतशांती, विनायक शांती, सप्तशती पाठ वाचन, अघोर होम तेजोभारण (कळकर्षत) विधी आदी विधिवत पूजा सपत्नीक झाली.
सन 2012 - 13 वर्षापासून श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाज नियोजन करून विश्वस्त संस्थेने सप्तशृंग गड येथील पुजारी वर्गाच्या विनंती पत्रानुसार शासनाच्या पुरातत्व विभाग औरंगाबाद व आय.आय.टी.पवई मुंबई यांच्याकडे जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कन्सलटन्ट यांच्यामार्फत संबंधित पूर्तता सुरू केली मात्र संस्थेच्या या निर्णयाला अनेक बाजूने विरोध दिसून आले पण संबंधित विषयावर संस्थेने संपूर्ण विषयाची माहिती ही सर्वत्र समजून विरोधाचे समाधान करून दिले व आलेल्या सर्व महंत, आमदार श्री नितीन पवार तसेच संपूर्ण मान्यवरांचे समाधान करून आलेल्या मान्यवरांचे सत्कार मा. अध्यक्ष श्री. वर्धन पी. देसाई व विश्वस्त ॲड. श्री. ललित निकम यांच्या हस्ते मा. आमदार श्री. नितीनपवार, महंत व तसेच संपूर्ण मान्यवरांचे सत्कार यावेळेस करण्यात आले.
याप्रसंगी श्री भगवतीला नतमस्तक होऊन ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात महंत सुधीरदास महाराज यांनी विश्वस्त व ट्रस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असताना सांगितले की सुमारे 250 वर्षांपूर्वी श्री भगवती मूर्ती संवर्धन झाल्याचे दाखले धर्मशास्त्रात उपलब्ध असल्याचे सांगितले व त्याचबरोबर श्री भगवती मूर्ती संवर्धन व देखभाली बाबत आमदार श्री. नितीनपवार यांनी ट्रस्टच्या मुख्यकार्यालयाला भेट देऊन सदर कामाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती ही अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यान सह प्रशासना मार्फत जाणून घेतली व अनेक शंकांचे समाधान यावेळेस ट्रस्टच्या वतीने करण्यात आले तसेच मा. अध्यक्ष श्री. वर्धन पी. देसाई व विश्वस्त ॲड. श्री. ललित निकम यांनी मा. आमदार श्री. नितीन पवार यांना शाल, श्रीफळ व फोटो देऊन सत्कार करण्यात केला.
यावेळेस महंत, आमदार व मान्यवरांशी बोलताना संस्थेमार्फत सांगण्यात आले की श्री भगवती स्वरूप/ मूर्ती संवर्धन बाबत श्री भगवती मंदिर दिनांक 21/07/2022 ते 05/09/2022 पावेतो बंद राहणार असून भाविकांना पर्यायी दर्शन व्यवस्था म्हणून पहिली पायरी येथे श्री भगवतीची प्रतिकात्मक मूर्ती ठेवण्यात आली आहे विधिवत पूजाप्रसंगी वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, महंत सुधीरदास महाराज, महंत दिनेश गायधनी, राहुल बेळे, प्रणव पुजारी, योगी अवंतिकानाथ जुनागड गिरनार गुजरात, राष्ट्रसंत आनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, सिद्धेश्वरानंद सरस्वती, श्री नाथानंद सरस्वती, श्री रामानंद सरस्वती व आमदार श्री. नितीनपवार, मा. अध्यक्ष श्री. वर्धन पी. देसाई , मा. विश्वस्त ॲड. श्री. ललित निकम, सौ.मनज्योत पाटील, डॉ. श्री. प्रशांत देवरे, व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे, बांधकाम विभाग प्रमुख श्री. नानाजी काकळीज, श्री. नरेंद्र सूर्यवंशी व आदी ट्रस्ट कर्मचारी व ग्रामपंचायत सप्तशृंग गड ग्रामपालिका पदाधिकारी सह आदी मान्यवर उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….