श्री भगवती स्वरूप व मुर्ती देखभाल संदर्भिय पुर्ततेकामी श्री भगवती मंदिर दि. २१ जुलै २०२२ ते दि. ०५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत संपुर्णतः बंद राहणार.

0
सप्तशृंग गड/माय मराठी एक्सप्रेस
        साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो बायकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरूप व मुर्ती देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी. पवई (बाम्बे) अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय पुर्ततेकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून श्री भगवती स्वरूप व मूर्ती देखभाल संबंधीत पूर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे. संदर्भिय प्रक्रीयेकामी आवश्यक ते धार्मिक विधी व त्या अनुषंगीक संस्कार संदर्भिय पुर्तता तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत संस्थेच्या पुरोहीत वर्गा मार्फत नियोजीत करण्यात आलेली आहे. श्री भगवती स्वरूप व मुर्ती देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार दि. २१/०७/२०२२ पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपूर्णत: बंद राहणार आहे मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असणार आहेत, यावेळेस विश्वस्त अॅड श्री. ललित निकम / डॉ. श्री. प्रशांत देवरे / सौ. मनज्योत पाटील / श्री. भूषणराज तळेकर .अशी माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे.

श्री भगवती स्वरुप व मुर्ती देखभाल संदर्भिय पुर्तते दरम्यान श्री भगवती मातेच्या धार्मिक विधी व पुजा अनुषंगीक नियोजन.

जेष्ठ पुरोहीत प्रतिनिधी श्री. प्रमोद दिक्षीत

       आद्यस्वयम् शक्तीपित श्री सप्तशृगी देवी मातेच्या स्वरूप / मुर्ती बाबत पुरोहीत वर्गाने वेळोवेळी विश्वस्त संस्थेकडे वर्ष २०१२-१३ पासून आवश्यक तो पाठपुरावा सुरु ठेवला असून त्या अनुषंगाने नवनिर्वाचीत विश्वस्त कार्यकारिणी मंडळाने योग्य ती दखल घेवून त्याबाबत त्वरीत निर्णय घेवून श्री सप्तशृंगी देवी मातेच्या स्वरूप / मुर्ती सदर्भिय शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी, पवई (बॉम्बे) यासह में अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत योग्य ते परिक्षण / निरीक्षण व तांत्रीक अभिप्राय घेवून तसेच धार्मिक विधी आदींचे मार्गदर्शन प्राप्त करून प्रत्यक्ष श्री भगवती मातेचे स्वरूप / मुर्ती देखभाली बाबत नियोजन निर्धारीत केले असून त्या अनुषंगाने पुरोहीत वर्गा मार्फत विविध धार्मिक पिठातील विद्वान / धर्मशास्त्र पारंगत श्री गणेश्वर शास्त्री धर्म मार्तंड) द्रविड शास्त्री (काशी / वारानशी), श्री. राजराजेश्वर द्राविड, धारवाड (कर्नाटक), श्री शांताराम भानुसे, नाशिक, श्री भालचंद्र शौचे नाशिक, श्री. बाळकृष्ण दिक्षीत, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक व व्यबकेश्वर पुरोहीत संघ याकडून योग्य त्या धार्मिक व धर्मशास्त्रातील संदर्भासह विधीवत पुजेथे तपशिल प्राप्त करून घेण्यात आले असून, त्याची विधीवत पूर्तता करुन प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे. आज आषाढ शुध्द पौर्णिमा बुधवार, दि. १३/०७/२०२२ प्रथम ग्रामदेवत्तेसह सर्व ग्राम देवतांना पान. सुपारी, नारळ दक्षणा देवून कार्य सुरु करणेकामी विनंती करून कार्यास येण्याचे निमंत्रण दयावे व श्री भगवतीची विशेष पंचामृत महापूजा करून अनुष्ठानास प्रारंभ करून अनुष्ठानात श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, कुजीका स्तोत्र, देवी अथर्व शिर्ष वनवानेव मंत्र जप सुरु केले आहेत. तर आषाढ वद्य अष्टमी बुधवार, दि. २०/०७/२०२२ रोजी विनायक शांती होम, अदभूत शांती, अघोर होम, तेजोवारण (कलाकर्षण) इत्यादी निर्धारीत विधी संदर्भिय पुर्तता केली जाणार आहे. तदनंतर दि. २१/०७/२०२२ पासून प्रत्यक्ष श्री भगवती स्वरूप / मुर्ती देखभाल संबंधीत कार्यवाही सुरु असताना १० हजार पाठाचे वाचन करण्याचे नियोजन निर्धारीत केलेले आहे. तसेच कार्यपुती नंतर विधीवत धार्मिक पुजेसह श्री भगवती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. सदर धार्मिक विधीसह तात्रीक पुर्तता करताना विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यासह कार्यालयीन प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपालिका यांनी पुरोहीत वर्गास योग्य ते सहकार्य दिले असून, लवकरच निर्धारीत नियोजना प्रमाणे सदमिय कार्याची पुर्तता श्री भगवती यशस्वीरित्या करून घेईल अशी श्री भगवती चरणी प्रार्थना.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !