साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरुप / मुर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी, पवई (बॉम्बे) यासह में अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय पुर्ततेकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करुन श्री भगवती स्वरुप / मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे. श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार, दि. २१/०७/२०२२ पासून पुढील ४५ दिवस म्हणजेच ५ सप्टेंबर पर्यंत आई सप्तशृंगी चे मंदिर बंद असल्याची माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली असून श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णतः बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असणार आहेत. याबाबतची सविस्त माहिती / तपशिल हे बुधवार, दि. १३/०७/२०२२ रोजी सकाळी ११.१५ वाजता मौजे श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथिल विश्वस्त संस्थेच्या मुख्यकार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर पत्रकार परिषदे दरम्यान मा. विश्वस्त मंडळ प्रतिनिधी मार्फत माहिती / तपशिल उपलब्ध होणार असून सदरच्या पत्रकार परिषदेत आणखीन काय निर्णय होणार याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….