सप्तशृंगी गड | आईसाहेब श्री सप्तशृंगी देवीला मराठी नूतन वर्षानिमित्त १०१ किलो हार्डकंगनची गाभार्‍याला सजावट...

1 minute read
0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
    साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्षानिमित्त आईसाहेब राज राजेश्वरी श्री सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्याला आई सप्तशृंगीचे नाशिकचे भाविक श्री जयेश मांडलिक यांनी तब्बल १०१ किलो हार्डकंगन व फुलांची आईच्या गाभाऱ्याला सजावट केली गेल्या एक वर्षापासून अनेक सणानिमित्त आई सप्तशृंगीच्या गाभाऱ्याला वेगवेगळ्या फळांनी , फुलांनी आई सप्तशृंगीच्या गाभार्‍याला सजवीत असतात त्याच प्रमाणे आज गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने आई सप्तशृंगीच्या गाभाऱ्याला पुन्हा एकदा सजविण्यात आले. यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी व मंदिर इंचार्ज नारद आहिरे सेवेकरी सुनील कासार व इतर भाविक भक्त उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !