सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व त्याचबरोबर पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दिनांक १० एप्रिल पासून आई अंबेचा चैत्र उत्सवाला सुरुवात होणार आहे पण एसटी महामंडळाच्या संपामुळे भाविक भक्तांना, गावकऱ्यांना व त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट हे नाशिक महानगरपालिकेला सिटीलींक म्हणजे सिटी बस ही सप्तशृंगी गडापर्यंत सुरू करण्यात यावी असे निवेदन देणार आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे कोरोना काळात २ वर्ष बंद होते व त्यामुळे नवरात्र उत्सव आणि चैत्र उत्सव या दोन्ही वर्षातील यात्रा सप्तशृंगी गडावर झालेले नाहीत त्यामुळे व्यापारी वर्ग व ग्रामस्थ हे मोठ्या आर्थिक संकटामध्ये अडकलेले आहेत व या उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या एसटी महामंडळाचा संप यामुळे सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सवाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो जसे सप्तशृंगी गडावर यात्रा कालावधीमध्ये कोणतेही खाजगी वाहन सोडले जात नाही व या उत्सवाच्या दरम्यान संपूर्ण भाविक व ग्रामस्थ हे एसटी महामंडळाच्या मार्फतच प्रवास करतात पण या उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या एसटी महामंडळाचा संप यावेळेस यात्रेत भाविकांना व ग्रामस्थांना अनेक संकटे उभे राहतील व त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची सिटीलींक ही नाशिक ते सप्तशृंगी गड सुरू करावी अशी मागणी देवी संस्थान, सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व त्याचबरोबर ग्रामस्थ सुद्धा करीत आहे.
नाशिक महानगर पालिकेची सीटीलिंक बससेवा दिंडोरीपर्यंत सुरु करण्यात आली आहे. या बससेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून ही बससेवा थेट सप्तशृंगीगड पर्यंत सुरु करण्याची मागणी भाविक, नागरिक व विद्यार्थी करीत आहे. या कठीण परिस्थितीतण जिल्ह्यातील नागरिकांसाठी नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंकने आता नाशिकरोड ते दिंडोरी या ग्रामीण भागात सिटी बसच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. सकाळी सहा ते सायंकाळी सात दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरु करण्यात आली आहे. या मार्गावरील बससेवेला विद्यार्थी, चाकरमानी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून सिटीलींगने आता सप्तशृंगी गडा पर्यंत बससेवा सुरु करुन आदिमायेच्या भक्तांची सोय करावी. ही बससेवा सुरु केल्यास भाविकांबरोबरच वणी, कळवण, सुरगाणा भागातून नाशिक येथील चाकरमाने, विद्याथी व ग्रामिण भागातील प्रवाशांची चांगली सोय होऊ शकेल. या बससेवेला चांगला प्रतिसादही मिळू शकणार असल्याने पर्यायाने सीटीलिक सेवेला सप्तशृंगी गड मार्गावर बससेवा सुरु करावी.
प्रतिक्रिया :-
नाशिक महानगरपालिकेची सीटीलिंक बससेवा त्र्यंबकेश्वर प्रमाणे सप्तशृंगीगडावर सुरु केल्यास नाशिक दर्शनासाठी आलेल्या भाविकांबरोबरच मार्गावरील प्रवाशांची चांगली सोय होईल. याबाबत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करणार आहे.
- ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार व ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट वरील संपूर्ण विश्व स्थान सोबत चर्चा करून नाशिक महानगरपालिके सिटी लिंक बाबत निवेदन देण्याचा विचार आहे.
- ॲड. दीपक पाटोदकर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, विश्वस्त.
भाविकांची यात्रेच्या कालावधीत गैरसोय होऊ नये याकरिता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट हे भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता प्रयत्नशील आहे व त्याच्या प्रयत्नांना पैकी एक म्हणजे विश्व स्थान सोबत चर्चा करून नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा ही सप्तशृंगी गडापर्यंत सुरू व्हावी याकरिता पत्रव्यवहार करण्याचा विचार विश्वस्त मंडळायांचा आहे.
-ॲड. ललित निकम सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, विश्वस्त.
नाशिक सिटी लिंक ही बस सेवा त्र्यंबकेश्वर प्रमाणेच सप्तशृंगी गडावर सुरू करावी याकरिता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष हे नाशिक महानगरपालिके शी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
- अजय दुबे व्यापारी संघटना अध्यक्ष सप्तशृंगी गड व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष.
एसटी संपामुळे सप्तशृंगीगडावर भाविकांच्या गर्दीवर मोठा परिणाम झाला आहे.
- सप्तशृंगी गड, प्रेस क्लब.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....