सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
नांदुरी ते सप्तशृंगी गड येण्याकरिता अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था…
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दिनांक ४ एप्रिल रोजी सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये यात्रा नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व ग्रामपंचायत आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट ला आव्हान केले की नियोजन नुसते कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात आणावे. आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून पूर्ण यात्रा काळात चौक कामगिरी पार पाडण्याचे आव्हान अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी केले. श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर १० एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या चैत्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीस पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे तहसीलदार बंडू कापसे गटविकास अधिकारी निलेश पाटील उपस्थित होते पोलीस, वनविभाग, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विभाग, फ्युनीकुलर रोपवे व इतर विभागांचा आढावा घेण्यात आला व यात श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती येण्याकरिता अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था यावेळेस करण्यात आली आहे व त्याचबरोबर संपूर्ण सप्तशृंगी गडावर प्लास्टिक कॅरी बॅगची बंदी करण्यात आली आहे.
सप्तशृंगी गडावर दोन वर्षानंतर तोरणाच्या नियमावरील निर्बंध शितीला केल्याने गडावरील पारंपारिक पद्धतीने चैत्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यामुळे सध्या गडावरील व्यापारी वर्ग आनंदी मय झाले आहे व्यापाऱ्यांची मालन याकरिता लगबग सुरू झाली आहे भाविकांना दर्शनासाठी बॅरिकेट मधूनच सोडण्यात येणार आहे मंदिर परिसर विविध ठिकाणी 256 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे प्रवेश द्वाराजवळ नियोजन कक्ष स्थापन करण्यात येणार असून मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे वनविभागातील आदित बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली असून त्याकरिता इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नांदुरी ते सप्तशृंगी गड या दहा किलोमीटर अंतरावरील घाटात भाविकांना येण्याकरिता सुलभ व्हावे याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे नांदुरीच्या पायथ्याशी बस स्थानकाची सोय करण्यात आली असून गडावरही बस स्थानकाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्याप्रमाणे जादा बसेसची नियोजन केले आहे वनविभाग, अन्न प्रशासन विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत देवी संस्थान आदींचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते बैठकी तहसीलदार बंडू कापसे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल तांबे पोलीस निरीक्षक समाधान नागरे ग्रामपंचायत सप्तशृंगी गड नांदुरीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक देवी संस्थांचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….