सप्तशृंगी गड | सप्तशृंगी मातेच्या चैत्र यात्रेस हर्षमयी वातावरणात सुरुवात...!

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस

               लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. सकाळची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यामुर्ती मा. श्री. सुनिल बी. शुक्रे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नाशिक मा. श्री. अभय एस. वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष तथा अति. सत्र न्यायाधीश, मा. श्री. वर्धन पी. देसाई, जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी श्री नितिन आरोटे, विश्वस्त अॅड. श्री. ललित निकम, सौ. मनज्योत पाटील, डॉ. श्री. प्रशांत देवरे, श्री. भूषणराज तळेकर, व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

             चैत्रौत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून एकूण २६९ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षरक्षकांसह महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत एन वेळेस उदभवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली असून विश्वस्त संस्थेच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व विश्वस्त संस्थेचे एकूण ३ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० हंगामी कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आलेली आहे. दि. १०/०४/२०२२ ते दि. १६/०४/२०२२ दरम्यान पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी १०० एस टी बसेस प्रवाशांना नांदुरी येथून ने - आण करणार आहेत. सप्तशृंगगडा पासून एक किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.

श्रद्धा दानातून प्रचिती देते...
              चैत्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथिल श्रद्धाळू भाविक ज्यांनी मागील ४०वर्ष श्री भगवतीच्या घटी बसण्याच्या कार्यात अनवाणी पावलांनी सेवा केली त्यांनी श्री भगवती मंदिर जीर्णोद्धार उपक्रमात रु. ३ लक्ष रकमेची देणगी देवून त्याच्या श्रद्धेची दानातून प्रचिती करून दिली. प्रसंगी विश्वस्त संस्थेच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त मंडळ आणि कार्यालयीन व्यवस्थापनाने श्री दौलत गणपत सनांसे यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या श्री भगवतीच्या सतात्यापूर्वक सेवेबाबत आभार व्यक्त केले.

                चैत्र उत्सव यात्रा यशस्वीतेसाठी विश्वस्त संस्थेचे कार्यकारिणी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे आदींसह विविध विभाग प्रमुख, सहा विभाग प्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहेत.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !