TELEGRAM APP :-
TELEGRAM APP ... |
नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे आजचा ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग मध्ये आपण WhatsApp सारखे पर्यायी App बघणार आहोत मित्रांनो अनेक लोक WhatsApp सारखे पर्याय App पाहत असतात तर WhatsApp सारखेच Telegram हे App आहे पण मित्रांनो प्रत्येक App ची एक खासियत असते तसेच या App ची ही काही खासियत आहे तर चला बघूया Telegram या App ची काय काय खासियत आहे व हे आपण WhatsApp ला पर्याय म्हणून वापरू शकतो का?
मित्रांनो TELEGRAM या App विषयी तुम्ही पहिले काही ऐकले आहेत का ? Telegram हे App आज-काल मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे Telegram हे App Social Messaging Platform आहे आपण पाहणार आहोत Telegram हे App आपल्या SmartPhone मध्ये कसे Download करायचे व त्याचबरोबर Telegram या App मध्ये आपले Account कसे तयार करायचे Telegram वर दर महिन्याला (Wikipedia च्या आकडेवारीनुसार) वापरत असलेले User जवळपास 400 Million लोकं पेक्षाही जास्त आहे व रोज 1.5 Million लोक नवीन User Account बनवत आहे आणि हे App वापर करत आहेत.
Telegram App काय आहे ?
Telegram App एक Cloud Based App आहे ज्याला 2013 साली Nikolal आणि Pavel Durov या दोन भावांनी बनवले आहे याचा वापर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घरातल्या व्यक्तींसोबत व इत्यादी लोकांसोबत चर्चा करण्याकरिता वापर करू शकतात इथे Cloud Based याचा वापर म्हणजे Telegram या App वर तुम्ही तुमचा जेवढा पण Data Upload केला आहे तो Data Cloud Storage Server वर Save केला जातो या Application च्या माध्यमातून तुम्ही फक्त Message नाही तर तुम्ही Photos, Video, Audio, Document, Paul इत्यादी File पाठवू शकतात.
Telegram App वर Account कसे बनवायचे ?
GOOGLE PLAY STORE ... |
Telegram या App वर Account बनवणे अतिशय सोपे आहे Telegram Application Google Play Store वर उपलब्ध आहे जिथून तुम्ही Telegram हे App अतिशय सोपे मार्गाने तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये Download करू शकतात.
Play Store Search Telegram App... |
या करता तुम्हाला आधी तुमच्या स्मार्टफोन मध्ये Google Play Store Open करावे लागेल Open केल्यावर तुम्हाला सर्वात वरती Search Bar मध्ये Telegram हे नाव लिहावे लागेल व लिहिल्यानंतर शेजारील Search वर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला Telegram हे App दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर Install हे नाव दिसेल त्या बटनावर क्लिक केल्यावर Telegram हे App Install होईल Telegram App तुमच्या स्मार्टफोन मध्ये Install होईल install झाल्यावर Telegram या App वर क्लिक केल्यानंतर App Open होईल Open झाल्यावर...
Start Messaging ... |
तुमच्या समोर Start Messaging या नावाचं एक बटन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे.
Enter Your Mobile Number ... |
मोबाईल नंबर देऊन झाल्यावर खाली असलेल्या बाणाच्या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला एक Verification Code विचारला जातो .
Enter Your Verification Code ... |
हा Verification Code Telegram App ची Team तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर Verification Call येईल Verification Call आल्यावर ते तुम्हाला एक Verification Code सांगतील Verification Code सांगितल्यावर हा कोड तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर इंटर करावा लागेल इंटर केल्यावर खाली बाणाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे Telegram Verified होईल Verified झाल्यावर तुम्हाला तुमचे First Name व Last Name लिहायचे आहे लिहिल्या नंतर तुमचे Telegram या App वर तुमचे Account अकाउंट तयार होईल Account तयार झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांची परिवारातील सदस्यांची संभाषण (Chat) करू शकतात. |
Telegram या App चे फायदे :-
१) यामध्ये तुम्हाला WhatsApp प्रमाणे ग्रुप तयार करता येतात पण मित्रांनो WhatsApp मध्ये फक्त 257 व्यक्ती हे एका ग्रुप मध्ये Chat करू शकतात पण Telegram या App मध्ये 2,00,000 व्यक्ती एका ग्रुप मध्ये Chat करू शकतात व मित्रांनो 48 तासात कोणताही मेसेज एडिट करू शकतात व कोणत्याही वेळेस डिलीट करू शकतात दोन्ही बाजूंनी .
२) ग्रुपमधील व्यक्तींशी व्हॉइस चॅट करू शकतात.
३) एखाद्या व्यक्तीशी पर्सनली चॅट करता येथे .
४) मित्रांनो प्रत्येक App ची एक खासियत असते व ती म्हणजे YouTube प्रमाणेच तुम्हाला Telegram या App वर स्वतःचे Channel सुरू करता येते.
५) व्हिडिओ कॉल तुम्ही करू शकतात.
६) एखादा विषय आपण Telegram या App वर Upload केल्यानंतर काही लोक जर चैनलला नंतर जॉईन झाले तरीसुद्धा Telegram या App वर त्यांना आधी इन्फॉर्मेशन जी अपलोड झाली आहे ती सुद्धा बघता येते.
७) हे ॲप मल्टी डिवाइस सपोर्ट करते म्हणजेच WhatsApp सारखे एकाच मोबाईलवर न वापरता अनेक मोबाईल वरती ही Telegram हे App आपण वापरू शकतो तसेच हे Android, iPhone, Windows इत्यादी वर आपण वापरू शकतो.
८) वापर करता टेक्स्ट मेसेज, फोटो, डॉक्युमेंट, वापरकर्त्याचे लोकेशन, गाणे, मोबाईल नंबर, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज असे इत्यादी प्रकार आपण Telegram वर वापरू शकतात.
९) म्हणजेच मित्रांनो टेलिग्राम घ्या ॲप वर आपण एका व्यक्तीशी व अनेक व्यक्तींचा ग्रुप करून त्यांच्याशी चॅट करू शकतो व स्वतः चे चैनल सुरू करून लोकांपर्यंत आपले स्किल पोचू शकतो.
१०) WhatsApp प्रमाणे Telegram या App वर तुम्ही Emoji, स्टिकर, वेबसाइटच्या लिंक शेअर करू शकतात.
११) एखाद्या विषयावर पोल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात.
१०) WhatsApp प्रमाणे Telegram या App वर तुम्ही Emoji, स्टिकर, वेबसाइटच्या लिंक शेअर करू शकतात.
११) एखाद्या विषयावर पोल सुद्धा तुम्ही घेऊ शकतात.
इत्यादी असे Telegram या App चे फायदे आपल्याला पाहायला मिळतात.
Telegram या App चे तोटे :-
मित्रांनो आपण Telegram या App चे फायदे पाहिले पण Telegram या App चे काही तोटे सुद्धा आहेत.
१) यामध्ये तुम्हाला WhatsApp सारखा Status Upload करता येत नाही किंवा Status चे Option नाही.
असे इत्यादी तोटे आपल्याला Telegram या App चे पाहायला मिळतात.
अशा पद्धतीने आपण आज Telegram या App वर Account कसे बनवायचे Telegram या App चे फायदे आणि तोटे आपण आजच्या ब्लॉक मध्ये पाहिले .
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...