सप्तशृंग गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दि.१५ मार्च २०२३ रोजी तहसीलदार श्री बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा आढावा (नियोजन) बैठक संपन्न झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव (ता.३०) पासून सुरुवात होत आहे. यात विविध ठिकाणाहून श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर लाखों भाविक हे यात्रा कालावधीत सप्तशृंग गडावर येत असतात व यादरम्यान कोणतीही आपात कालीन परिस्थिति निर्माण होऊ नये याकरिता तहसीलदार श्री बंडू कापसे यांनी विविध विभागाची माहिती घेतली.
यात्रे दरम्यान भाविक मध्य प्रदेश, गुजरात व अधिकतंम हे खानदेशमधील शेवटच्या टोकावरचे भाविक दोन -दिवसांत पायी यात्रेने गडाकडे मार्गस्थ होतात यात धुळे, शिरपूर, चाळीसगाव साक्री, पारोळा आदी ठिकानहून भाविक हे सहभागी होत असतात या भविकांकरीत काय सुविधा करतात भाविकांना कडून विविध प्रकारचा महसूल व नफा मिळवतो तरी सुविधा का देत नाही आपण असा सवाल तहसीलदार श्री बंडू कापसे यांनी विचारला नवरात्र उत्सव दरम्यान श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आईन ७ व्या माळीला जी परिस्थिति उतभवली आशी परिस्थिति पुन्हा होणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले दरम्यान एसटी महांमडळची गेल्या वेळेची हलगर्जीपणा झालेचे ही यावेळी तहसीलदारांनी सांगितले. ही यात्रा ही खांदेशी लोकांचा जास्त सहभाग असल्याने व अधिकतं भाविक हे पायी गडाकडे मार्गक्रमण करतात. या करीत मूलभूत सुविधा सुद्धा नसतात असेही श्री बंडू कापसे यांनी सांगितले दरम्यान प्रतेक ठिकाणी पिण्याचे पानी, स्वच्छता गृह, बस सेवा सुरळीत, गर्दीचे नियोजन असे अनेक गरजेच्या विषयांवर तहसीलदारांनी विविध विभागांना सूचना दिल्या दरम्यान श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड श्री ललित निकम यांनीही बस बाबतची हलगर्जी पण सांगितला दरम्यान यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांच्या बैठका घेऊन तयारी सुरू आहे असे विविध मंडळांच्या प्रतिनिधीने सांगितले यादरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थाशशी ही माझे बोलणे झाले आहे असे BDO पाटील यांनी सांगितले.
सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव या वर्षी मार्चच्या चौथ्या आठवडयात आला असून, कडक ऊन श्रद्धाळूची परीक्षा पाहणार आहे. दर वर्षी उत्सवासाठी चार ते पाच लाख भाविक पायी येतात यात खानदेशवासीयांचा मोठा सहभाग असतो. विविध मंडळे सोबत डीजे घेऊन जातात. सप्तशृंगी देवीची गाणी गात गडाकडे मार्गस्थ होतात. हजारो भाविकच्या सामानासाठी असलेल्या वाहनांची नांदुरीच्या रस्त्यांवर गर्दी होते व दरम्यान बस करीत मोठी जागेचीही मागणी यावेळी केली गेली त्यातच दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कडक उन असले तरी यंदा यात्रेकरूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
"किर्तीध्वज संदर्भीय तारखेची भाविकांनी नोंद घ्यावी."
सालाबादप्रमाणे चौदासच्या दिवशी अर्थात मंगळवार दि. ०४/०४/२०२३ रोजी श्री भगवतीच्या किर्तीध्वजाचे विधिवत पूजन होवून मानकरी गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातून श्री भगवतीच्या पर्वत शिखरावर सदर दिवशी रात्री ध्वजारोहण होणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यावेळेस तहसीलदार बंडू कापसे, बी. डी. ओ पाटील, पोलीस प्रशासन समाधान नागरे, फॉरेस्ट अधिकारी, सप्तशृंगी गड सरपंच रमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, राजेश गवळी, नांदुरी सरपंच, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त एडवोकेट ललित निकम, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, तसेच विविध विभागीय ट्रक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते
औषधांसह जेवणाचीही व्यवस्था...
पायी यात्रेमध्ये सर्वाधिक संख्या धुळे शहराची असते. त्याखालोखाल शिरपूरहून श्रद्धाळू येतात. धुळे जिल्ह्यातील जवळपास दोन लाखांवर भाविक पायी यात्रेने गडावर जातात. यात्रेकरूंना धुळे ते नांदुरीपर्यंत ठिकठिकाणी चहा, पाणी, नाश्ता, औषधे, जेवण, आदींची व्यवस्था स्वयंसेवी संस्था व दानशूरांकडून केली जाते त्यासोबतच प्रशासणानेही काही डॉक्टर व मदतनीस ठेवावे असेही सांगितले. खानदेशकडून येणारे श्रद्धाळू शहर व परिसरात विविध संस्था कडून या कालावधीत विविध स्टॉल लावले जातात उन्हाची तीव्रता लक्षात घेता या वर्षी पाणपोयींची संख्या वाढवावी असेही सांगितले.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….