सप्तशृंगी गड | श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा, ६७ वृक्षांची लागवड...!

0
संपूर्ण गडावर निसर्गाला हिरवी चादर परिधान करण्याचा मानस असून कार्यालयीन व्यवस्थापन स्मृतीवन उपक्रमासाठी सातत्त्यपूर्वक प्रयत्नशील आहे. - व्यवस्थापक

 सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
            साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर व पर्यावरण संवर्धन हेतूने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथिल शिवालय तिर्थ परिसरात विविध औषधी व बहुउपयोगी वनस्पती प्रकारातील एकूण ६७ वृक्षांची लागवड मा. जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट श्री. वर्धन पी देसाई व त्यांच्या धर्मपत्नी सौ. अरुंधती देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आली.दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर व पर्यावरण संवर्धन हेतूने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते व ते वृक्ष निरंतर संस्थेच्या माध्यमातून सांभाळ हा केला जातो दरवर्षी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट ही विश्वास संस्थान अनेक उपक्रम ही वर्षभर राबवत असते व त्याच्या पैकी एक म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व त्या वृक्षांचा सांभाळ करणे हे संस्थेचे न चुकणारे व सन २०१४ पासून नियमित हे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.
            जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रमाची प्रस्तावना करतांना विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार विश्वस्त संस्थेच्या ६७ व्या वर्धापनदिन विचारात घेता वृक्षारोपणाची संख्या ही ६७ निर्धारित केली असून, वर्ष २०१४ पासून दरवर्षी विश्वस्त संस्थेच्या वतीने स्मृतीवन प्रकारात सदरचा वृक्षारोपणाचा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर घेतला जातो. आज पावेतो एकूण ५५० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून त्यातील बहुसंख झाडे जतन करण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रकल्पासाठी सामाजिक वनीकरण, वन विभाग यांचे आवश्यकतेनुसार सहकार्य तसेच मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे अमूल्य मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.भविष्यकाळात अधिकतम संख्येने सदरचा उपक्रम निर्धारित करून संपूर्ण गडावर निसर्गाला हिरवी चादर परिधान करण्याचा मानस असून कार्यालयीन व्यवस्थापन स्मृतीवन उपक्रमासाठी सातत्त्यपूर्वक प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्न व संकल्पनेला शुभेच्छा देवून मा. वर्धन देसाई यांनी पर्यावरण संवर्धनात सर्वांनी स्वयंसेवी प्रकारात सक्रिय सहभाग घ्यावा व प्रत्येक व्यक्तीने झाडे लावावे व त्या झाडांचे संगोपन करावे असे आवाहन केले.
            प्रसंगी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, अधीक्षक श्री प्रकाश जोशी, सुरक्षाधिकारी श्री यशवंत देशमुख तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रमोद देशमुख, श्री संतोष चव्हाण, श्री अशोक पवार, श्री राजेंद्र पवार, श्री चंदर गवे, श्री बाळू पवार, श्री शांताराम बर्डे, श्री. राज जोशी, श्री केशव पवार, श्री खंडू वाघ, श्री रवींद्र पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !