सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभु शक्तीपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास गुरुवार (दि. ३०) रोजी प्रारंभ झाला. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सपत्नीक सकाळी ७ वाजता देवीची पंचामृत महापूजा केली. यावेळी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री वर्धन पी. देसाई यांनी देखील भगवतीची मनोभावे पूजा केली. चैत्रौत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थे मार्फत अन्नपूर्णा प्रसादालयात मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून, श्री भगवती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये या दृष्टीने उद्भोदन कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच एकूण २५६ सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची भविकांवर नजर ठेवून आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बल, सुरक्षा रक्षकांसह, महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग देखील लक्ष ठेवून आहेत.ऐन वेळेस उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच विविध ठिकाणी माता भगिनी करीता हिरकणी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. उत्सवकाळात अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनासाठी व मदतकार्य प्रक्रियेसाठी 1800 2334 067, 02592 253350 टोल फ्री क्रमांकाची सुविधा ट्रस्ट तर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँडची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. चालू वर्षी भाविकांच्या निवाऱ्याचे सोई बाबत शिवालय तलाव परिसरात ९०x१३० आकारमानाचा निवारा शेड भाविकांच्या सोईसाठी उभारण्यात आलेला आहे त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान विश्वस्त संस्थे तर्फे करण्यात येत आहे तसेच चालू वर्षा पासून श्री भगवती मंदिरात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मुख दर्शनाची व्यवस्था सुधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांच्या सोईसाठी फ्यूनिक्युलर रोपवे व ट्रस्ट तत्पर आहे तसेच फ्यूनिक्युलर रोपवे प्रकल्प येथील विश्वस्त संस्थेचे देणगी व चौकशी कार्यालय, लाडू काउंटरचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्री. एस. डी. जगमलाणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. श्री वर्धन पी. देसाई, विश्वस्त अॅड. श्री. लालित निकम, विश्वस्त सौ. मनज्योत पाटील, विश्वस्त डॉ. श्री. प्रशांत देवरे, विश्वस्त श्री. भूषणराज तळेकर, व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, श्री. नानाजी काकळीज, श्री. भिकन वाबळे, श्री. प्रकाश जोशी, श्री. प्रकाश पगार, श्री. शाम पवार, श्री. राजू पवार, श्री. सागर निचीत, श्री. नरेंद्र सुर्यवंशी, श्री. किरण राजपूत, श्री. शरद शिसोदे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेश गवळी, श्री. विवेक बेणके, श्री. निर्मल डांगे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला, उत्सव कालावधीत गर्दीच्या नियोजनाकरीता सुरक्षारक्षक, मरासुम सुरक्षा बल, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी वर्गाचे उत्सव पूर्व मॉकड्रिल घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आहे.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….