सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती (दि.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलन झालेल्या चित्ररथाचे विशेष सादरीकरण गुरुवारी (दि. १६) वणी शहरात करण्यात आले त्यानंतर सायंकाळी नांदुरी येथून सप्तशृंग गडावरती प्रस्थान झाले व सप्तशृंग गडावरती श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पार्किंग येथे वास्तव्य झाले त्यानंतर (दि.१८) रोजी सकाळी ९.३० वाजता शिवालय तलाव येथे रथाची विधीवत पूजा सप्तशृंग गड ग्रामपंचायत सरपंच श्री रमेश पवार, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त श्री.भूषण तळेकर, सौ. मनज्योत पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके राजेश गवळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे यांसह सप्तशृंग गडावरील प्रतिष्ठित नागरिक तसेच श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश जोशी यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा संपन्न झाली.यानंतर शिवालय तलाव ते श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या पहिली पायरी पर्यंत चित्रकथाची मिरवणूक ही संपूर्ण ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व मोठा जोशात काढली यावेळेस गावकऱ्यांनी संपूर्ण रस्ता भर रांगोळ्यांचे पायगडे घातले होते तसेच सोबतच फुलांची आरासरी यावेळेस करण्यात आली होती पहिल्या पायरी येथे चित्ररथाची विधीवत पूजा ही पुरोहित संघाच्या मार्फत करण्यात आली यावेळेस महाआरतीचा मान श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त सौ मनज्योत पाटील, श्री भूषण तळेकर ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, अजय दुबे, संदीप बेनके, राजेश गवळी आदी प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली.
जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. साडेतीन शक्तिपीठांवर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथे झाल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते. दिल्लीत कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरविलेला हा महाराष्ट्राचा चित्ररथ सप्तशृंगगडच्या पावनभूमीत आल्याने सप्तशृंगगड ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. सादरीकरणात कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. चित्ररथाचे संयोजक जयेश खोट यांचा सत्कार श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी सप्तशृंगगड करांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. सर्व नागरिकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन सप्तशृंग गड ग्रामपंचायत व श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या मार्फत केले होते.
सप्तशृंगगड येथे दाखल झालेल्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित चित्ररथ पाहण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
(छाया राज रघुवीर जोशी)
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….