सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी मातेच्या भाविकांच्या सेवेत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट ही धार्मिक व सेवाभावी संस्था मागील ६५ वर्षा पासून कार्यरत आहे. सद्यस्थितीत भाविकांसाठी श्री भगवतीची दैनंदिन दर्शन, पंचामृत महापुजा आरती, महाप्रसाद व भक्तनिवास व्यवस्थेसह मोफत आरोग्य सेवा-सुविधेसह धर्मार्थ रुग्णालय व रुग्णवाहीकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हा परिसर हा नाशिक जिल्हयातील दुर्गम बहुसंख्येने व्यापलेला असून, शैक्षणिक व आरोग्य विषयक सेवा सुविधा बाबत अद्याप अपेक्षित प्रमाणात वधारलेला नाही. पर्यायी विश्वस्त संस्थेने मौजे सप्तशृंगी गड येथिल गरजवंत नागरीक / भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध असून, त्यासाठी भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय, नाशिक तर्फे सी आर निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार्डियाक अॅम्ब्युलन्स श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला अर्पण स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. सदरच्या कार्डियाक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून भाविक व आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक उपचारासह रुग्णसेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
सदर सुविधे संबंधित दि. १८/०३/२०२२ रोजी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा मा. दिपनकुमार दत्ता - मुख्य न्यायमुर्ती यांच्या पत्नी सौ. जूम्मा दत्ता, मा. न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. तदनंतर मान्यवरानी श्री भगवतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. वर्धन देसाई, विश्वस्त ऍड श्री. ललित निकम, मुख्य व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री.भगवान नेरकर, कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख श्री. यशवंत देशमुख, श्री. प्रशांत निकम, श्री. सुनिल कासार, श्री. संतोष चव्हाण, श्री शाम पवार, श्री नरेंद्र महाले व इतर कर्मचारी वर्ग तसेच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत पदाधिकारी व भाविक वर्ग आदी उपस्थित होते. अशी माहिती ट्रस्ट प्रशासनाने दिली.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....