सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर होळी पोर्णिमा या पावन सणानिमित्त आई सप्तशृंगीच्या गाभाऱ्याला १०१ किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. सालाबाद प्रमाणे प्रत्येक हंगामात आई भगवतीच्या गाभाऱ्याला हंगामाप्रमाणे प्रत्येक फळाची आरास ही केली जात असते तसेच आज दिनांक 17 मार्च 2022 होळी पौर्णिमा निमित्य आई आंबेच्या गाभाऱ्याला १०१ किलो द्राक्षांची आरास करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई अंबेचे लाखो भाविकांपैकी काही भाविक हे हंगामाप्रमाणे अनेक फळे हे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला देत असतात व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत हे फळ आई भगवतीच्या गाभाऱ्याला आरास करून आई आंब्याच्या लाखो भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी व आई सप्तशृंगीचे भाविक भक्त आणि गावकऱ्यांनी आरास करण्याकरिता अनमोल सहकार्य केले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....