सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अनेक प्रयत्नांनंतर भुमिअभिलेखच्या पथकाकडून सिटीसर्वेचे काम प्रारंभ झाले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर लाखो भाविकांची वर्दळ ही वर्षभर सुरू असते सप्तशृंगी गड हे धार्मिक स्थळा सोबतच पर्यटन स्थळ असल्याने वर्षाकाठी येथे लाखो भाविक येत असतात व यांच्या सोयीकरिता चार-साडेचार हजार वस्ती असलेले ग्रामस्थ हे सप्तशृंगी गडावर अनेक वर्षांपासून रहिवासी आहेत पण आई सप्तशृंगीच्या या सप्तशृंगी गडावर अजून पर्यंत सुद्धा सिटी सर्वे नसल्यामुळे ग्रामस्थांना यामुळे त्रास होत होता जसे की बँका कर्ज देत नव्हत्या, जागा विकण्याकरिता अनेक अडचणी येत होत्या पण दर ग्रामसभेत ग्रामस्थ व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय दुबे यांनी वेळोवेळी आवाज उठून आग्रहाची भूमिका घेऊन आज त्या भूमिकेला यश आल्याचे दिसून येत आहे.
मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ पासून सप्तशृंगी गडावर भुमिअभिलेखनाचे उपाधिक्षक श्री हेमंत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या चहुबाजूने वन हद्दीची पाहणी करून सर्वेला प्रारंभ केला आहे सिटीसर्वे मुळे संबंधित जागा व त्या जागेचे महत्त्व वाढत असल्याने या सिटीसर्वे बाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वे साठी सप्तशृंगी गडाचा समावेश करावा असा आग्रह धरला होता त्याला यश आल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. कळवण येथील उपअधीक्षक भुमिअभिलेखन कार्यालयाकडून पाहणी करून हे काम एका संस्थेला दिले आहे या कामासाठी ग्रामस्थांमध्ये सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आग्रहाची भूमिका घेतली होती सर्व प्रसंगी उपाधीक्षक राणे यांच्या सोबत दयानंद गीते, सप्तर असोसिएटचे जयेश देवरे, सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, ग्रामसेवक संजय देवरे, मधुकर गवळी, विजय दुबे, घनश्याम गायकवाड, साई बेनके, विनायक दुबे, प्रकाश कडवे, छगन जाधव, अमृत पवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गावठाण क्षेत्र कमी आहे तसेच गावालगत वनविभाग असल्याने सदरचा सर्वे करताना जुने गावठाणचा आधाराव गावाचा सर्वे केला जाणार आहे.
-हेमंत राणे उपअधीक्षक भुमिअभिलेखन कार्यालय, कळवण.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....