सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
धरणात मुबलक साठा असून सुद्धा सप्तशृंगी ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यात असमर्थ...
दोन-तीन दिवसात संपूर्ण गावाला पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा काढण्यात येईल नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अजय दुबे यांचा ग्रामपंचायत ला इशारा...
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर महिलांना पाण्यासाठी करावे लागते वन-वन. सप्तशृंगी गडावरील नागरिकांना गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दररोज तीस रुपये प्रमाणे पाण्याचा जार विकत घ्यावा लागत आहे. प्रत्येक महिन्याला ९०० रुपये, तर वर्षाकाठी दहा हजार आठशे रुपये एका कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. सप्तशृंगी गडावर तब्बल चार ते साडेचार हजार गावची लोकसंख्या असून, दररोज पाणी विकत घेणे परवडत नसल्याने संतप्त महिला वर्गाने ग्रामपंचायत सदस्यांच्या दारी जाऊन ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरले.
भवानी तलावातून अशुद्ध पाणीपुरवठा...
सप्तश्रृंगी गडावर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याची समस्या अधिकाधिक बिकट होत चालल्याचे चित्र दिसत आहे. पाणीपुरव छोटासा भवानी पाझर तलाव असून, या तलावातून सध्या तीन दिवसाआड गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु तलावातील गेल्या बऱ्याच वर्षापासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे आरोप ग्रामस्थ करीत असल्याने या पाण्याचा वापर फक्त धुणीभांडी व आंघोळीसाठी केला जातो.
ग्रामपंचायत घेते बघ्याची भूमिका...
सप्तशृंगी गड वासियांनी भरपूर दिवस भवानी पाझर तलावाचे पाणी पिले, परंतु अशुद्ध पाणी येत असल्याने येथील नागरिकांना पोटाचे विकार,मुतखडा असे आजार जाणवू लागल्याने हे पाणी फक्त वापरासाठीच करतात. शुद्ध पाणी मिळण्यास मोठी अडचण झाली असून, गावात पाणी व्यवस्था नसणे हा ग्रामस्थांच्या जिवाशई खेळण्याचा प्रकार सुरू आहे. सप्तशृंगी गड ग्रामपंचायत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
गळतीसह अडीच कोटी गेले वाहून...
पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. सप्तशृंग गड वासियांसाठी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सप्तशृंगी गड हे पावसाचे माहेरघर समजले जाते. येथे प्रमाणापेक्षा जास्त अतिवृष्टी होत असते परंतु पाझर तलावातून पाण्याची मोठ्या प्रमाणावरगळती सुरू आहे. या तलावासाठी अडीच कोटी रुपये खर्च करून गळती थांबवण्यासाठी काम केले होते, परंतु गळती थांबली नाही. या गळतीबरोबरच अडीच कोटी वाहन गेल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे.
गडावर पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
हंडाभर पाण्यासाठी सप्तशृंगी गड़ वासियांना तीस रुपये मोजावे लागत आहेत. तीन दिवसांनी पाणी सोडण्यात येते. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार व दुर्लक्षामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करत फिरावे लागत आहे.
- नवनाथ बेनके, सप्तशृंग गड सामाजिक कार्यकर्ते
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....