सप्तशृंग गड | सप्तशृंगगड येथे ढगफुटी सारखा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात पाऊस...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस

      साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर ढगफुटी सारखा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मंदिराच्या वरील बाजूने अचानक वाहून आलेल्या पावसाने संपूर्ण उतरती पायरी मार्गावर पुरासारखी परिस्थिती तयार केली आणि त्यात मोठ्या संख्येने दगड, माती आणि झाड वाहून आली. प्रसंगी त्या मार्गे मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांना सुखरूपपणे विश्वस्त संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने खाली आणून त्यांना योग्य ते उपचार देवू केले आहेत. जवळपास ७ भाविकांना सदर घटने दरम्यान किरकोळ ईजा झाली असून त्यावर योग्य ते उपचार धर्मार्थ व ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहेत. घटनास्थळी ट्रस्ट व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सुरक्षा अधिकारी आदी स्वतः उपस्थित होते दरम्यान प्रक्षिणा मार्ग खचला असून लवकरच त्याची डागडुजी करावी लागणार आहे.ट्रस्टच्या मार्फत १२ महिने कार्यरत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आणि कमांडो फोर्स ने विशेष परिश्रम घेवून भाविकांची सुरक्षित ठिकाणी हालचाल करून घेतलीहवामान खात्याने देवू केलेल्या सूचनांचा विचार करता भाविकांनी अतिवृष्टी सदृश परिस्थिती योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट कडून भाविकांना जाहीर आवाहन...

        सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी सुरू असून श्री क्षेत्र सप्तशृंगगड परिसरात देखील पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. पर्यायी घाट रस्ता, मंदिर परिसर व इतरत्र संततधार सुरू असून, आज सोमवार, दि. ११/०७/२०२२ रोजी दुपारी १.१५ वाजता मंदिराच्या वरील भागांत / डोंगर परिसरात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण होवून एकाचवेळी पावसाचे पाणी उतरत्या पायरीवर वाहून आल्याने त्याबरोबर दगड, माती आणि झाडं येवून पायी मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपत्ती व्यवस्थापन टीम सोबत आवश्यक ते मदत कार्य करत सुरक्षित ठिकाणी हलवले असून कोणतीही नियंत्रण बाह्य परिस्थिती घडलेली नाही. पर्यायी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अतिवृष्टीच्या परिस्थिती सुरक्षित प्रवासाची योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !