सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
सप्तशृंगी गडावर बुधवारी ( दि ३१ मार्च ) सकाळी ११ वाजता भक्तांगण हॉलमध्ये विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक अंतर ठेवून ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी विश्वगामी पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा उपस्थित सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार , संदीप बेनके , राजेश गवळी , अजय दुबे , बेबीबाई जाधव , ग्रामसेवक देवरे , सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , सप्तशृंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी भरत पाटील , विश्वगामी पत्रकार संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शहा , उपतालुका अध्यक्ष सोमनाथ मानकर , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष आहिरे , तालुका संघटक रघुवीर जोशी , जेष्ठ पत्रकार तुषार बर्डे यांच्या हस्ते ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार व कोरोना काळात काम करणारे मान्यवरांना कोरोना योद्धा सन्मान पत्र वाटप करण्यात आले .
पत्रकार संघाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र (नांदुरी) यांचा संयुक्त विद्यमानाने सप्तशृंगी ग्रामस्थांची (अँटीजन) कोरोना ३०० , लोकांची तपासणी करण्यात आली . त्यात ३८ रुग्ण अहवाल (पॉझिटिव्ह) आढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे . याच अनुषंगाने सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतीचा वतीने दि ३१ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत जनता कयूंचे आदेश दिले आहेत . सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थेने पाच दिवस मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका स्वाती मोरे , विद्या गांगुर्डे , आनंद वाघ , पिंटू तिवारी , दीपक बर्डे आदींनी परिश्रम घेतले .
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...