साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर याआधी सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतनी संपूर्ण व्यापारी वर्गाला नोटीस बजावल्या होत्या की कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही त्या अनुषंगाने विश्वगामी पत्रकार संघ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी यांच्यामार्फत सप्तशृंगी गडावर दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी 300 लोकांची ऑंटीजन टेस्ट करण्यात आली यामध्ये सप्तशृंगी गडावरील 38 ग्रामस्थ कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण गडावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु हे ३८ पॉझिटिव रुग्ण आता बरे झाले आहे ही एक गड वासियांना आनंदाची गोष्ट आहे या आधारे सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी यांच्यामार्फत दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे भक्तांगं हॉल या ठिकाणी परत ग्रामस्थांची ऑंटीजन टेस्ट करून 101ऑंटीजन लसीचे डोस देण्यात आले या वेळेस फक्त तीन ग्रामस्थ कोरोना पॉझिटिव निघाली.
यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वनाथ राठोड, आरोग्य सहाय्यक श्री आर एल पात्रे, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी गायत्री जाधव , आरोग्य सेवक भरत पाटील, आरोग्य सेविका भारती राऊत , अंगणवाडी कार्यकर्ती स्वाती मोरे , आशा स्वयंसेविका विद्या गांगुर्डे , सेविका साबळे, सेविका ठाकरे या सर्वांनी कोरोना लसीकरणाचे 101 लाभार्थ्यांना लस देण्यात आली तसेच 120 लाभार्थ्यांचे अंतिजन टेस्ट करण्यात आली या टेस्टमध्ये ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले यावेळेस अनमोल सहकार्य ग्रामपंचायत सप्तशृंगी गड सरपंच रमेश पवार, विद्यमान सदस्य संदीप बेनके, विद्यमान सदस्य राजेश गवळी, व सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत चे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळेस सर्व पत्रकार बांधवांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली की गडावरील अंगणवाडी सेविका या रात्रंदिवस कोरोना ची माहिती घरोघरी जाऊन देत असतात त्यामुळे त्यांना PPA किट देण्यात यावी असे ग्रामपंचायत व पत्रकार बांधवांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली.
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी....