सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
अनेक वर्षांची परंपरा आजही कायम...
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अनेक वर्षांपासून चैत्र उत्सव व नवरात्र उत्सवात किर्ती ध्वज आई आंब्याच्या शिखरावर फडकविला जातो .
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वर्षातून दोन यात्रा होत असतात त्या म्हणजे चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव यामध्ये चैत्र उत्सवाचे महत्व काही वेगळेच आहे कारण की या यात्रेत आई सप्तशृंगी च्या माहेरचे म्हणजेच खानदेशातील लाखो लोक येत असतात आणि अनेक ठिकाणाहून आई सप्तशृंगीचे भक्त येत असतात व हे भक्त किर्ती ध्वज फडकलेल्या बघितल्या नंतरच परत आपल्या गावी निघतात. गेल्या वर्षभरापासून सरकारी नियमाप्रमाणे मागील तीन यात्रा रद्द झाल्यामुळे भाविकांन मध्ये थोडी नाराजी दिसून येत आहे पण ध्वजाची परंपरा ही कायम असल्याने ग्रामस्थ व भाविकांना आनंद झाल्याचे दिसून येत आहे.
दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर अनेक वर्षांची कीर्तिध्वज परंपरा सरकारी नियमाप्रमाणे पार पडली सोमवारी मध्यरात्री गडाच्या शिखरावर किर्ती ध्वज डौलात फडकला. 'कोरोना'च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द असल्याने भाविकांशिवाय चैत्रोत्सव व ध्वजारोहण सोहळा झाला . कोरोनाचे संकट निवळून आदिमायेचे रूप व शिखरावर डौलात फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन लवकरच घेता यावे, यासाठी लाखो भाविकांनी घरूनच आदिमायेचे पूजन केले आहे .
चैत्रोत्सवातील चतुर्दशीला ( चावदस म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ) धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने याच दिवशी आदिमायेच्या शिखरावर कीर्तिध्वज लावण्याची परंपरा वर्षानुवर्ष कायम आहे . या अद्भुत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक उन्हातान्हाची मजल - दरमजल करत गडावर येतात व आदिमायेपुढे नतमस्तक झाल्यानंतर शिखरावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन माघारी परततात . मात्र, 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी या अद्भुत सोहळ्यासाठी भाविकांना उपस्थित राहता आलेले नाही . सोमवारी आई भगवती ची नित्यनेमात पंचामृत महापूजा झाली. दुपारी साडेतीनला श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन विश्वस्त मनज्योत पाटील यांनी कीर्ती ध्वजाला खणानारळाची ओटी भरून व पाच फळांची ओटी भरून आईकडे मागणं मागितलं की जसं तू महिषासुराचा वध करून प्रजेला महिषासुराच्या आसुरी दृष्टीतून मुक्त केलं होतं त्याचप्रमाणे कोरोणाच्या राक्षसापासून संपूर्ण जगाला मुक्त कर अशी प्रार्थना या वेळेस केली.
विश्वस्त मनज्योत पाटील यांनी कीर्ती ध्वजाला खणानारळाची ओटी भरली.
विश्वस्त मनज्योत पाटील.
विश्वस्त ललित निकम.
विश्वस्त भूषण तळेकर.
सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडेे आदी उपस्थित होते.
ध्वजाचे मानकरी दरेगावचे एकनाथ गवळी , काशीनाथ गवळी आदींच्या हस्ते झाले .
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन .
या वेळी ११ मीटर लांबीचा केसरी ध्वज , ६० फूट लांबीचा ध्वजस्तंभ व ४१ प्रकारचे पूजेचे साहित्य मानकरी गवळी व सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले . त्यानंतर कोणतेही वाद्य न लावता , पोलिस बंदोबस्तात ध्वज गडावरील देवतांच्या भेटीसाठी गवळी पाटील कुटुंबातील निवडक सदस्यांनी पहिल्या पायरीपर्यंत नेले . या वेळी गडावरील सर्व भाविक व ग्रामस्थांनी कोविड नियमांचे पालन करीत मिरवणुकीत सहभागी न होता दुरूनच कीर्तिध्वजाचे दर्शन घेतले.
पोलिस बंदोबस्तात ध्वज गडावरील देवतांच्या भेटीसाठी गवळी पाटील कुटुंबातील निवडक सदस्यांनी पहिल्या पायरीपर्यंत नेले .
दरम्यान , गवळी पाटील यांनी सायंकाळी सातला आदिमायेचे दर्शन घेऊन शिखरावर जाताना मार्गातील सर्व देवदेवतांचे पूजन करीत मध्यरात्री समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६ ९ फूट उंचावर असलेल्या गडशिखरावर डौलात ध्वज फडकविला.MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी...