सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
सप्तशृंगी देवीचे मंदिर... |
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया आदिशक्ती आई सप्तशृंगीच मंदिर पुन्हा एकदा बंद श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड -१ ९ संदर्भीय रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत , सप्तशृंगी गड यांनी जा क्र ०४/२०२१ नुसार जनता कफ्र्यु संदर्भात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट , सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक व भाविक वर्गाच्या आरोग्य व जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा ही गुरूवार दि . ०१/०४/२०२१ पासून सोमवार , दि . ०५/०४/२०२१ पावेतो संपूर्णतः बंद राहील . मात्र श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल . तरी भाविकांनी सदर नोंद घेवून विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे . असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे व हे आव्हान सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ अतिशय काटेकोरपणे पळत असल्याचे आपल्याला दिसत आहेत.
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी.