ता. १५ : कोविड काळात वित्तिय नियोजन काळाची गरज असून भविष्यात धोके जास्त आहेत, वित्तीय साक्षर असणे ही आज काळाची गरज आहे. डिजिटल युगामध्ये बँकिंग व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करणे सोपे झाले आहे. यात नेट बँकिंग, मनी ट्रान्स्फर यांचा उपयोग व्यवहारात केला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केले कर्मवीर रावसाहेब थोरात कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वित्तीय साक्षरता अभियानाप्रसंगी ते बोलत होते. वित्तीय साक्षरता अभियानाच्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी. दरेकर होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्र वणी शाखेचे व्यवस्थापक सचिन लोखंडे होते. बँकेचे अधिकारी संजय कांबळे,केशव रासकर उपस्थित होते. व्यवस्थापक सचिन लोखंडे यांनी बचत खाते, क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग, बँकांच्या विविध अॅप व त्यांची सुरक्षितता, विविध विमा योजना, पीपीपी अकाउंट, वित्तीय व्यवस्थेच्या अंतर्गत आजच्या काळात गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज वैयक्तिक कर्ज, अपघात विमा, बचत खाते, विमा आरोग्य विमा, अशा अनेक योजनांची माहिती यांनी दिली. संजय कांबळे यांनी आरोग्य विमा, त्याचे फायदे याविषयी माहिती दिली. प्राचार्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. डी. वाळके यांनी क्लेम सेटलमेंट, विमा क्लेम करण्याचा कालावधी, आरोग्य विमाच्या संदर्भातील कोणकोणत्या आजारांना आरोग्य विमा उपयुक्त आहे, याविषयी विविध प्रश्नांवर चर्चा केली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. प्रसाद यांनी आभार मानले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....