साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगी मंदिराच्या गाभाऱ्यात एक हजार किलो वजनाच्या १४ प्रकारच्या फळांनी आरास करण्यात आली आहे. या अनोख्या सजावटीमुळे येणाऱ्या भाविकांना देवीचे आकर्षक स्वरुप दिसले. ही सजावट राज्यात आकर्षणाचा केंद्र ठरला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी माता मंदिरात नाशिक येथील विशाल पाटील आणि मित्रपरिवाराच्या वतीने सप्तशृंगी देवीला अनोखे वंदन करण्याच्या दृष्टीने देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात सफरचंद, डाळिंब, द्राक्ष, अननस, संत्री, ऊस, मोसंबी अशी सुमारे १४ प्रकारची व सुमारे १ हजार किलो वजनाच्या फळांची आरास केली आहे. ही कामगिरी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. ही आरास देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे मन मोहून टाकत आहे. महत्वाचे म्हणजे या फळांचा अपव्यय न होऊ देता १७ जानेवारी रोजी हीच फळे भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतील. तसेच १७ तारखेला विविध भाज्यांचा वापर करुन सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आणि जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....