ता. 14 साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सालाबाद प्रमाणे दीड वर्ष वगळता दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी आई सप्तशृंगी च्या चरणी नतमस्तक होतात पण यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे व डेल्टा मुळे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अगदी तुरळक गर्दी दिसून आली कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निबंधांच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. निर्बंध लागू करण्यापूर्वी देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती, तर आता मात्र परिसर ओस पडला आहे राज्य सरकारने लग्नसोहळ्यासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० जणांची उपस्थिती तर पर्यटनस्थळ बंद, मैदाने, उद्याने सुद्धा बंद तसेच रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सप्तश्रृंगगडावरील सुमारे १०० पेशा जास्त व्यावसायिकांना निर्बंधाची झळ बसली आहे आता कुठेतरी दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला होता व अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येत होती व मागील दीड वर्ष मंदिर बंद होते. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले होते. कर्ज फेडायचे कसे असा मनात विचार असताना ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने व शासनाने निर्बंध लावल्याने नारळ, ओटी, प्रसाद, पेढे आदी दुकानदारीवर पुन्हा संकट ओढवल्याने गर्दीवर परिणाम झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सप्तशृंगी गडावर मागील काही काळा पासून असे अनेक संकटे येत असल्याने सप्तशृंगी गडावरील व्यापाऱ्यांनी काढलेले कर्ज भरायचे कसे असे व्यापाऱ्यांना प्रश्न पडला आहे सप्तशृंगी गडावरील होत असलेला शुकशुकाट हा गडावरील व्यापाऱ्यांना मोठया आर्थिक संकटात नेतोका काय ? याच संपूर्ण सप्तशृंगी गडावरील व्यापाऱ्यांना प्रश्न पडला आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....