वणी | वणी मधील जगदंबे मातेचे मंदिर उजळले ११ हजार दिव्यांनी...

0
वणी/माय मराठी एक्सप्रेस
            येथील जगदंबा माता मंदिरात मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सवामुळे परिसर उजाळला होता. सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या येथील जगदंबा मातेच्या मंदिरात भोगीनिमित्त शिवशक्ती मित्रमंडळ शिर्डी (साकुरी शिव) हे श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ (जगदंबादेवी (मंदिर) यांच्या सहयोगाने दरवर्षीमकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १२ हजार एक दिव्यांची आरास केली जाते यंदा ११ हजार दिवे लावण्यात आले होता. त्यामुळे मंदिर परिसर तेजोमय झाला होता. शिवशक्ती मित्रमंडळ व शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने मंडळाचे अंबादास आसणे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगीगड अशा साईनाथांच्या पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे २३ वे वर्षे असून, दरवर्षी मकरसंक्रांतीला पदयात्रेकरू सप्तशृंगगडावर आदिमायेच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा यात कोरोना नियम पाळत सव्वाशे भाविक सहभागी झाले होते. यावेळी आदिमायेची सांज आरती करण्यात आली.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !