सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर नाशिक वर्कर्स युनियन यांच्यावतीने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडे वेळोवेळी विविध मागण्यांसाठी निवेदन दिलेले असून सुद्धा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त याकडे लक्ष देत नसल्याकारणाने नाशिक वर्कस युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे देविदास आडोळे सरचिटणीस तुकाराम सोनजे व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने २४ मार्च रोजी बेमुदत संपावर जाणार होते पन काही मागण्या मान्य झाल्याने संप हा चैत्रोत्सवाचा विचार करता सदर संप स्थगित करण्यात आला आहे श्री सप्तशृंग निवासिनी ट्रस्टचे कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्या पुढील प्रमाणे
संपाची कारणे :
१) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग मागील फरकासह त्वरीत लागु करा.
२) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांची वेतनश्रेणी शासकिय अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करणे.
३) आपल्या अस्थापनात /देवस्थानात कामगार-कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंप धरतीवर नोकरीत सामावून घेणे.
४) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील कामगार-कर्मचारी यांना पर्यवेक्षक, लिपीक, सेवेकरी असे काम वर्षानुवर्षे करून घेतले जाते आणि पगार मात्र सेवकाचा दिला जातो. तरी काम व जबाबदारीनुसार वेतन द्यावे.
५) आपल्या अस्थापनात / देवस्थानात नवीन भरती न करता नविन कामगार-कर्मचारी यांना ट्रेनिंग देवून त्या जागेवर नियुक्त करा.
६) आपल्या अस्थापनात देवस्थानात काम करत असलेल्या दोन महीला कामगारांना अदयाप वाळांतपणाच्या रजेचे वेतन अदा केलेले नाही. ते त्वरीत अदा करा.
७) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियमानुसार किमान वेतन लागू करा.
या सर्व मागण्या देवस्थानला वेळोवेळी दिलेल्या असून सुद्धा देवस्थान याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे २४ तारखेपासून नाशिक वर्कर्स युनियन. संलग्न कर्मचारी हे संपावर जाण्याच्या तयारीत होते परंतु देवी संस्थानचे विश्वस्त अॅड श्री. ललित निकम व डॉ. श्री प्रशांत देवरे यांनी डी एल कराड व कर्मचारी यांच्याशी बैठक आयोजित केली होती व त्या बैठकीत सर्व काही मागण्या मान्य करून एक राहिलेली मागणी लवकरच पूर्ण करू अशी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे व चैत्र उत्सव जवळ असल्याकारणाने व कर्मचारी मागण्या मान्य केल्यामुळे भाविकांना योग्य त्या सुख सोयी वेळेला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….