सप्तशृंगगड | आई सप्तशृंगीच्या गाभाऱ्याला मराठी नूतन वर्षानिमित्त ३०० किलो द्राक्षांची आरास...

0
सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
                साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्या स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो बायकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती आज मराठी नववर्ष आणि साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने आद्यस्वयंभु शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी पहाटे प्रात समयीच्या आरतीपासून भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शुभ मुहूर्त साधत भाविकांनी देवीचं दर्शन घेतले. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. "वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तावर हा एक मुहूर्त आहे. आज सप्तशृंगगडावर ही गुढीपाडव्याचे मंगलमय वातावरण दिसून आले. आजची पंचामृत महापूजा नाशिक येथील देवीभक्त सुधीर सोनवणे यांनी केली. 
     सप्तश्रृंगी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची व द्राक्षांची सजावट करण्यात आलेली असून नाशिक देणगीदार भाविक अँड अनमोल चंद्रकांत पाटील यांमार्फत ३०० किलो द्राक्षांची सजावट करण्यात आलेली आहे. तर मुंबई येथील देवीभक्त विमल पवार यांनी फुलांची सजावट केली आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण बघायला मिळाले. विशेष म्हणजे आज देवीला भरजरीची गुलाबी रंगाचे महावस्त्र नेसविण्यात आलेले आहे. तसेच गुढीपाडव्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टच्या मुख्यकार्यालायापासून ते मंदिरा पर्यंत देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. आज देवीला चांदीचा मुकुट, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कुयरी हार, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, सोन्याची नथ, सोन्याचे कर्णफुले, चांदीचा कमरपट्टा, चांदीच्या पादुका आदि आभूषणे देवीला परिधान करण्यात आले आहेत. अशी माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !