सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर वर्षभरात लाखो भाविक हे आई सप्तशृंगी च्या चरणी नतमस्तक होत असतात व नवरात्र आणि चैत्र उत्सव दरम्यान विविध राज्य व महाराष्ट्रातील धार्मिक भाविक हे जास्तीत जास्त संख्येने सप्तशृंगी गडावरती यात्रेदरम्यान श्री भगवतीचे दर्शन घेण्याकरिता जमत असतात यातच श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व कर्मचारी यात्रेकरिता व वर्षभरात मोठे श्रम घेत असतात.यातच नाशिक वर्कर्स यांच्याकडून आणि चैत्र उत्सवाच्या दरम्यान दि.२४ ला संपाचा इशारा देण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या या वर्षानुवर्ष मान्य होत नसल्याने व त्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने दि.२४/०३/२०२३ पासून संपावर जाणार अशी माहिती नाशिक वर्कर्स यांच्या पत्रामार्फत देण्यात आली.
संपाची कारणे :
१) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग मागील फरकासह त्वरीत लागु करा.
२) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांची वेतनश्रेणी शासकिय अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करणे.
३) आपल्या अस्थापनात /देवस्थानात कामगार-कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंप धरतीवर नोकरीत सामावून घेणे.
४) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील कामगार-कर्मचारी यांना पर्यवेक्षक, लिपीक, सेवेकरी असे काम वर्षानुवर्षे करून घेतले जाते आणि पगार मात्र सेवकाचा दिला जातो. तरी काम व जबाबदारीनुसार वेतन द्यावे.
५) आपल्या अस्थापनात / देवस्थानात नवीन भरती न करता नविन कामगार-कर्मचारी यांना ट्रेनिंग देवून त्या जागेवर नियुक्त करा.
६) आपल्या अस्थापनात देवस्थानात काम करत असलेल्या दोन महीला कामगारांना अदयाप वाळांतपणाच्या रजेचे वेतन अदा केलेले नाही. ते त्वरीत अदा करा.
७) आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियमानुसार किमान वेतन लागू करा.
वरील कारणासाठी आपल्या अस्थापनातील / देवस्थानातील सर्व कामगार-कर्मचारी यांना हे दि. २४ मार्च २०२३ रोजी पहिल्यापाळीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत याची नोंद घ्यावी.
सकारात्मक निर्णय नाहीच...
सकारात्मक निर्णय न झाल्याने व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने संपावर आम्ही ठाम आहोत.
- श्री नारद आहिरे कर्मचारी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….