सप्तशृंगगड/माय मराठी एक्सप्रेस
नांदुरी ते सप्तशृंग गड येण्याकरिता अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था...
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर दिनांक २८ मार्च रोजी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये यात्रा नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस कळवणचे सहायाक् जिल्हाधिकरि विशाल नरवाडे यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना व ग्रामपंचायत आणि श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टला आव्हान केले की नियोजन नुसते कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात आणावे. आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून पूर्ण यात्रा काळात चौक कामगिरी पार पाडण्याचे आव्हान सहायाक् जिल्हाधिकरि यांनी केले. श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर ३० मार्च ते ०६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सव होणार आहे त्याच बरोबर शिखरावर ४ एप्रिल रोजी कीर्तिध्वज फडकणार आहे. तर 6 एप्रिलपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, वनविभाग, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विभाग, फ्युनीकुलर रोपवे व इतर विभागांचा आढावा घेण्यात आला यात श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती येण्याकरिता अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था यावेळेस करण्यात आली आहे व त्याचबरोबर संपूर्ण सप्तशृंग गडावर प्लास्टिक कॅरी बॅगची बंदी करण्यात आली आहे.
भाविकांना दर्शनासाठी बॅरिकेट मधूनच सोडण्यात येणार आहे मंदिर परिसर व विविध ठिकाणी 256 सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेले आहे प्रवेश द्वाराजवळ नियोजन कक्ष स्थापन करण्यात येणार असून मंदिराचे यात्रा कालावधीत सुशोभिकरण करण्यात येणार आहे वनविभागातील हद्दीत रस्त्याच्या दोन्ही कड्याला यात्रेनिमित्त दुकाने थाटले जाणार, कोंड्याची वीर (बस स्थानक) ते रोपवे गेट पर्यंत ठीक ठिकाणी टायगर ग्रुप तर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटर अंतरावरील घाटात भाविकांना येण्याकरिता सुलभ व्हावे याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे नांदुरीच्या पायथ्याशी बस स्थानकाची सोय करण्यात आली असून गडावरही बस स्थानकाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे यात मंकी पॉईंट येथे व रस्त्यातील विविध ठिकाणी महामंडळातर्फे विशेष कर्मचारी हे नेमण्यात येणार आहे व जादा बसेसची नियोजन केले आहे वनविभाग, अन्न प्रशासन विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत, देवी संस्थान आदींचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते बैठकीत कळवणचे सहायाक् जिल्हाधिकरि विशाल नरवाडे, कळवण तहसीलदार बंडू कापसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल तांबे,गटविकास अधिकारी नीलेश पाटील, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, ग्रामपंचायत सप्तशृंग गड सरपंच रमेश पवार, सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, ग्रामसेवक श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त एडवोकेट ललित निकम, संस्थांचे कर्मचारी भगवान नेरकर, भिकन वाबळे, प्रशांत निकम, प्रकाश पगार यांच्यासह विविध कर्मचारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सहायाक् जिल्हाधिकरि विशाल नरवाडे यांनी दिलेल्या सूचना...
१. ४० अतिरिक्त एमटी बस या सप्तशृंग गडावरती गर्दी काळात असणे आवश्यक.
२. बस बाबत कोणतीही अडचण यात्रा कालावधीत येता कामा नये.
३. यात्रा कालावधीत सायंकाळी सहा वाजता सर्व पदाधिकारी यांची रोज आढावा बैठक.
४. यात्रा कालावधीत डफ वादकांना शिवाय तलाव ते मंमादेवी चौकापर्यंतच डफ वाजवण्याची परवानगी.
५. विद्युत पुरवठा 24 तास हवा.
६. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे त्याचबरोबर आपत्ती जनक परिस्थितीला तात्काळ संपर्कात असावे.
७. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उष्णतेमुळे भाविकांना होणाऱ्या त्रासास तात्काळ मदत मिळण्याकरिता फिरते पथक व दवाखान्यातील चोख नियोजन असावे.
८. वन विभागातील हद्दीत बाहेरील व्यापारी जे व्यापारकरिता रस्त्यावर बसतात त्यांना बसून देणे.
९. नांदुरी व सप्तशृंगी गड ग्रामपंचायत ने यात्रा कालावधीत स्वच्छता, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, गावातील स्थानिक अतिक्रमण याकडे अधिक तर लक्ष द्यावे.
१०. बीएसएनएल मधील तांत्रिक अडचणी निदान यात्रा कालावधी तरी येऊ नये.
तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातील अडचणींचे निरसन करून यात्रा कालावधीत भाविकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये व यात्रा ही सुखरूप पार पाडावी याकरिता सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क रावे असे आव्हान सहायाक् जिल्हाधिकरि यांच्याकडून करण्यात आले.
MY MARATHI EXPRESS …
- राज रघुवीर जोशी….