सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दत्त जयंतीचे औचित्य साधत व नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता आई आंब्याचे नूतन वर्षाचे कॅलेंडर हे लोकार्पण करण्यात आले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे विश्वस्त ॲड. श्री दीपक पाटोदकर यांचे असे म्हणणे झाले की आई सप्तशृंगीचे दर्शन हे प्रत्येक भाविकाच्या घराघरांमध्ये झाले पाहिजे व हे होण्याकरिता ॲड. श्री दीपक पाटोदकर यांनी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दत्त जयंती चे औचित्य साधत आई सप्तशृंगी चरणी नवीन वर्षाची दिनदर्शिका हि लोकार्पण केली लोकार्पण सोहळा हा नाशिक येथीलकैलास मठातील महामंडलेश्वर सविधान आनंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे माजी व्यवस्थापक श्री सुरेश निकम, सप्तशृंगी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पवार, नांदुरी ग्रामपंचायतचे सरपंच राऊत, माजी उपसरपंच राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय दुबे,विश्वास संस्था अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सप्तशृंगी गड येथील पत्रकारांचे नूतन वर्षांच्या निमित्ताने सप्तशृंगीदेवीची प्रतिमा , शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त दीपक पाटोदकर यांचे आभार व्यक्त केले सप्तशृंगीदेवी चे 2022 ची दिनदर्शिका विश्वस्त व एक भाविक असल्याने जे आज सप्तशृंगी देवीची जी सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे त्याच उद्देशाने मी देवी संस्थान चा एक रुपया खर्च न करता स्वखर्चाने 2022 नूतन वर्षाचे दिनदर्शिका प्रसिद्धी करत आहे याचा उद्देश देखावा नसून घराघरात सप्तशृंगीदेवीची छायाचित्र असणे असा आहे आई सप्तशृंगी ची दिनदर्शिका हजारो भाविक भक्तांपर्यंत कशी पोहोचेल या उद्देशाने मी काम करीत आहे.
ॲड श्री दीपक पाटोदकर यांची मुलाखत -
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी.....