सप्तशृंगी गडाच्या घाटात होणार सप्तशृंगी हेल मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धेला सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचा विरोध पत्र देऊन केले स्पर्धेचा निषेध...
ग्रामस्थांच्या सूचनेकडे देवी संस्थान चे दुर्लक्ष नको त्या ठिकाणी ट्रस्टचे काटकसर...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मंदिरात जाण्यासाठी साडेपाचशे पायऱ्या भाविकांसाठी कुठेही पिण्याकरिता पाणी, वृद्धांकडे तपासण्याची सुविधा, वैद्यकीय कुठली सुविधा पायऱ्यांमध्ये नाही ही सुविधा करण्याऐवजी सप्तशृंगी ट्रस्तचा हेल्थ मॅरेथॉन चा घाट का भाविकांच्या व नागरिकांचा सवाल. सप्तशृंगी गड परिसरात विविध समस्यांचा डोंगर असताना भाविक भक्तांनी देवीचरणी दिलेला दान मॅरेथॉन स्पर्धा च्या आयोजन वर उधळण्याचा घाट काही विश्वस्त कडुन घातला जात आहे देवीच्या चरणी आलेले दानाची अशी उधळपट्टी करण्यापेक्षा गडावर येणारे भाविकभक्त साठी विविध सुखसुविधा उपलब्ध करून घ्यावेत आशा मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ विश्वस्त मंडळाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून करीत आहे याबाबत नुकतेच पञ दिले आहेत .
सप्तशृंगी गडावरील आदिमायाच्या 10 कि.मी घाटात 26 डिसेंबर रोजी होणारी सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धाला मैजे सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने विरोध केला असुन त्यासंबधी ग्रामपंचायतीने पञ देऊन सदरची स्पर्धा घेऊन नये व या घटनेचा निषेध करीत या वर बहिष्कार टाकल्याची माहिती सरपंच रमेश पवार सप्तशृंगी गड ग्रामपंचायत यानी दिली आहे. सदरची स्पर्धा हि फक्त नाशिक रन व देवी संस्थान याच्या मर्जीप्रमाणे करीत असतात व यापासुन कुठलाही फायदा अथवा गावाच्या विकासासाठी काय योगदान आहे आशी चर्चा जोर धरू लागली आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून स्पर्धेचे आयोजन करतात पण याबाबत गावाला व ग्रापंचायतीला विश्वासात घेत नाही सदर स्पर्धा हि गावाच्या हितासाठी साठी काही योगदान देत नसल्याने या स्पर्धा चा आम्ही जाहिर निषेध करून याला आमचा विरोध आहे स्पर्धा भरून काय साध्य करणार आशेही ही प्रश्न ग्रामस्थ विचारू लागेल आहेत. ग्रामपंचायतीच्या पञाला केराची टोपली दाखवतात कि लांखो रुपयाची गंगाजळी बिनदिक्कतपणे मॅरेथॉन स्पर्धाच्या आयोजनावर खर्च करण्याचा घाट सप्तशृंगी देवी संस्थान घाट घातला की का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सप्तशृंगगडावरील हिल मॅरेथॉन स्पर्धा ऐन भाविकांच्या गर्दीच्या दिवशी म्हणजे रविवारीच आयोजित केली असून , त्यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत . या स्पर्धेमुळे सकाळी ६ ते ११ या वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवावी लागणार असून , त्यामुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे . दुसरीकडे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक हजार व आठशे रुपये , असे शुल्क आकारले जाणार असल्याने त्यापासून आदिवासी तरुण दूरच राहतील गडावर येत्या २६ डिसेंबर रोजी हिल मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे . शहरांमध्ये शक्यतो रविवारी अशी स्पर्धा आयोजित केली जाते . कारण रविवारी शाळा , कार्यालये बंद राहत असल्याने रस्त्यांवर गर्दी कमी असते . मात्र , हाच नियम गडावर लावून येथेही रविवारीच स्पर्धा ठेवण्यात आली आहे . मात्र , रविवार हा सुटीचा दिवस असल्याने या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते .स्पर्धेसाठी घाट पाच तास बंद ठेवावा लागणार आहे . त्यामुळे याबाबत काहीही माहीत नसणाऱ्या भाविकांना उगाच ताटकळत थांबावे लागणार आहे .
-राजेश गवळी माजी उपसरपंच
दुसरीकडे , कळवण तालुक्यातील आदिवासीतरुणांमधील धावण्याची प्रतिभा जगासमोर यावी , असा या स्पर्धेमागील हेतू असल्याचे पत्रकार परिषेत ठामपणे सांगण्यात आले . त्यामुळे या स्पर्धेत कोण धावणार आणि या शुल्कातून कोणाचे खिसे भरणार ? ' नाशिक रनौंमध्ये सहभागी होण्यासाठी शंभर ते तीनशे रुपये शुल्क आकारले जाते . मग मॅरेथॉनसाठी आठशे ते हजार रुपये शुल्क आकारण्याचे काय प्रयोजन , असा प्रश्न विचारला जात आहे .
-पत्रकार तुषार बर्डे
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडे कोरोना काळात कर्मचाऱ्यांचे पगार करण्याकरिता पैसे नव्हते पैसे नसल्यामुळे ट्रस्ट कडून एफडी तोडून केले कर्मचाऱ्यांचे पगार तर लॉक डाउन नंतर हेल मॅरेथॉन वरती पैशाची उधळपट्टी का...?
- अजय दुबे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष.
या स्पर्धेबाबत संस्थानाने सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीला काहीही कल्पना दिली नाही या स्पर्धेला ग्रामपंचायतचा व आमचा विरोध असून, या आयोजनाचा आम्ही निषेध करीत आहोत याबाबत चेअरमन व विश्वस्तांना पत्र दिले आहे.
-रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगी गड.
सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धा घेण्यासाठी विश्वस्त मंडळ व चेअरमन यांची अद्याप बैठक झालेली नाही दोन-तीन दिवसात बैठक होणार आहे
-ऍड. ललित निकम सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी.....