सप्तशृंगी गड | दिवाळी सुट्टयांच्या कालावधीत ऑनलाईन दर्शन पासद्वारे होणार श्री भगवतीचे दर्शन...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
                सालाबाद प्रमाणे दिवाळी सुट्टींच्या कालावधीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी व कोविड -१९ अनुषंगीक नियमानुसार गर्दीचे नियोजन होणेकामी शासकीय आदेशा अनुरुप श्री भगवती दर्शनाची संधी विश्वस्त संस्थेने निर्धारीत केलेल्या नियमानुसार पहाटे ५.०० ते रात्री ९ .०० वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे . ऑनलाईन भाविकांनी माध्यमातून www.saptashrungi.net . पर्यायी किंवा www.ssndtonline.org/services/?p=registration या संकेतस्थळावरून स्वतःचा दर्शन पास उपलब्ध करुन घेणे तसेच खालील विविध सुचनांची / अटी व शर्तींची निर्धारीत पुर्तता करणे आवश्यक आहे . 
१ ) ऑनलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास ९ ०० प्रमाणे श्री भगवती दर्शनाची उपलब्धता भाविकांसाठी उपलब्ध असेल .
२ ) ऑफलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास १०० प्रमाणे श्री भगवती दर्शनाची उपलब्धता भाविकांसाठी उपकार्यालय व ट्रस्ट मालवाहू रोपवे येथिल इमारत जागेत उपलब्ध असेल . 
३ ) दर्शनार्थी भाविकांनी ऑनलाईन / ऑफलाईन पासवर निर्धारीत करुन दिलेल्या वेळेच्या ( स्लॉट ) किमान अर्धातास अगोदर मौजे सप्तशृंगगड येथे दर्शन रांग ( प्रवेशद्वार / फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प ) येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे .
४ ) श्री भगवतीचा ऑनलाईन दर्शन पास हा प्रवेशद्वारावर दाखविणे अनिवार्य असे 
५ ) दर्शनार्थी भाविकाचे वय किमान १० वर्षापेक्षा अधिक व वय वर्षे ६५ पेक्षा कमी असणे शासकीय नियमानुसार आवश्यक आहे . 
६ ) दर्शनार्थी भाविकाचे कोविड १९ संदर्भिय लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण असणे आवश्यक आहे ... 
७ ) ज्या भाविकांचे कोविड- १९ संदर्भिय लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण नसतील अशा भाविकांनी ७२ तासातील आर टी पीसीआर तपासणीचा निगेटीव रिपोर्ट अथवा २४ तासातील अॅन्टीजीन तपासणीचा निगेटीव रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे .
८ ) दर्शनार्थी भाविकांना कोविड -१९ संदर्भिय नियमानुसार मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टस पाळणे व थर्मल स्कॅनिंग संदर्भिय पुर्तता करणे बंधनकारक आहे . 
९ ) गर्दी कालावधी दरम्यान दि . ०६/११/२०२१ ते दि . २१/११/२०२१ व पुढील कालावधीत कोविड -१९ अनुषंगीक नियमांचे तंतोतंत पालन करणे हेतूने भाविकांनी व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करणे आवश्यक आहे .
१० ) दर्शनार्थी भाविकांनी जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विविध सुचनांची / अटी व शर्तीची निर्धारीत पुर्तता करुन आवश्यक ते सहकार्य देणे अपेक्षित आहे . ऑनलाईन दर्शन संदर्भात निर्धारीत प्रक्रीया कशी असेल याबाबतचे तपशिल व्ही डी ओ व प्रझेंटेशन प्रकारात विश्वस्त संस्थेच्या संकेतस्थळासह फेसबुक व इतर सोशल मिडीयावरती यापूर्वी माहितीस्तव सादर केलेली आहे . त्याचे अवलोकन करुन संदर्भिय ऑनलाईन पास बाबतची पुर्तता करुन घेण्यात यावी . तसेच संदर्भिय ऑनलाईन दर्शन पास संबंधीत तांत्रीक अडचण उदभवल्यास श्री . प्रशांत दामरे ( संपर्क क्र . ९ ४२२१०१११८ किंवा ९२२४३४६६०९ ) यांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी.....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !