सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आणि उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर कधी न घडणारी घटना २ तारखेच्या रात्री एकवाजेच्या सुमारास घडली सप्तशृंगी गडावरील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय रमाकांत दुबे यांच्या सप्तशृंगी लॉज शेजारी श्री अजय दुबे यांची स्वतःची रेनॉल कंपनीची डस्टर गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला सप्तशृंगी लोच्या अगदी शेजारी सप्तशृंगी गडावरील सब पोलीस चौकी आहे पण ही चौकी कायमस्वरूपी बंद असल्याने गडावरील नागरिकांना व येणाऱ्या भाविकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व नुकत्याच लागलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे अनेक भाविकांची वर्दळ ही सप्तशृंगी गडावरती होत आहे त्यात २ तारखेला रात्री श्री अजय दुबे यांचे गाडी जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे गडावरील नागरिक हे भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे.
काही गुंड प्रवृत्तीच्या इसमाकडून वाहन जाळण्याचा प्रकार उघडकीस आला असून कळवण पोलीस ठाण्यात संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्तशृंगीगड येथील मूळ रहिवासी अजय रमाकांत दुबे हे व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी गडावरील राहणारे महेंद्र ऊर्फ बंटी कोळपकर कासार ( हल्ली रा. त्रिमूर्ती चौक, नाशिक ) या इसमाबरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. तेव्हापासून महेंद्रने मनात राग धरून अजय दुबे यांना तुझे मोठे नुकसान करेल, अशी धमकी दिली होती. २ तारखेला मध्यरात्री १:४० च्या सुमारास अजय दुबे यांचे रेनॉल कंपनीचे डस्टर वाहन ( क्र. एम. एच. ४१ व्ही. ९ ३७२ ) जय माँ सप्तशृंगी लॉजिंगसमोर उभे केले होते. त्या ठिकाणी महेंद्र ऊर्फ बंटी मोटारसायकलवरून आला व त्याच्या सोबत असलेल्या पेट्रोलच्या बाटलीने सदर वाहनावर पेट्रोल टाकून त्याने आग लावली. वाहन जाळण्याचा प्रकार शरद वाजपेयी व महेश वाघ यांच्या निर्देशनास आल्यावर दुबे यांना त्यांनी फोनवरून सांगितले. आग त्वरित विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी दुबे यांना पेट्रोलची बाटली व दोन माचीस पेट्या तसेच अर्धवट जळालेला काळ्या निळ्या रंगाचा हातमोजा आढळला. त्यावरून त्यांना संशय आला की आपले वाहन कोणीतरी पेटवले आहे. समोरच असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात व्यक्ती वाहन जाळत असल्याचा प्रकार लक्षात आला. या प्रकारामुळे वाहनाचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.