सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी धनुर्मास उत्सवाला प्रारंभ झाला असून रविवार दिनांक 19 डिसेंबर पासून सुरुवात झाली सरत्या वर्षातील शेवटची पौर्णिमेचा योग साधत भगवती चा जयघोष करीत हजारो भाविक नतमस्तक झाले धनुर्मास हा सूर्य देवतेचा उत्सव समजला जात असल्याने या काळात सूर्यनारायणाची पूजा केली जाते या कालावधीत सूर्याचे किरण आदिमायेच्या चरण स्पर्श करत मूर्तीवर येतात हे दृश्य पाहण्यासाठी या कालावधीत भाविक सप्तशृंगी गडावर मोठ्या संख्येने येत असतात.
गुरुवारपासून दिनांक 16 डिसेंबर रोजी झालेला धनुर्मास उत्सव 13 जानेवारी 2022 पर्यंत असेल या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक रविवारी पहाटे पाच ला देवीची महापूजा प्रारंभ होतो सकाळी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर येतात व यानंतर देवीची आरती होते इतर दिवशी नियमानुसारच देवीची पूजा विधी होते रविवारी पहाटे पाच पासून पंचामृत पूजेस पुरोहितांच्या मंत्रघोषात सुरुवात झाली सकाळी सहाला आदिमायेच्या अलंकाराची ट्रस्ट कार्यालयात पूजा होऊन अलंकार मिरवणुकीने आदिमाया मंदिरात नेण्यात आले सूर्योदयाच्या वेळेनुसार पंचामृत महापूजेनंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आदिमायेच्या जयघोषात आरती झाली देवीस वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरी चा विशेष नैवेद्य दाखविण्यात आला.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी.....