सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाच्या तृतीय व चतुर्थीच्या मुहूर्तावर आई सप्तशृंगीची सकाळी श्री भगवतीची पंचामृत महापूजा मा. श्री राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त नाशिक व मा. श्री जयसिंगराव झपाटे, सह. धर्मदाय आयुक्त, नाशिक यांनी सपत्नीक श्री भगवतीची पूजा करून आशीर्वाद घेतला तसेच नाशिक येथील आमदार मा. सौ. सिमाताई हिरे व माजी महापौर श्री अशोक मुर्तडक यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री सौ. भारतीताई पवार यांनी सकाळी श्री भगवतीचे आशीर्वाद घेतले.
नवरात्र उत्सवामध्ये आई भगवतीला झेंडूचे फूल प्रिय असल्यामुळे आज तिसऱ्या व चौथ्या माळेला आई भगवती च्या संपूर्ण मंदिरात झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली होती त्यामुळे आई सप्तशृंगी चा गाभारा अतिशय मनमोहक दिसत होता. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाच्या तृतीय व चतुर्थीच्या मुहूर्तावर आई सप्तशृंगीची सकाळी सात साडे सात च्या दरम्यान महापूजा झाली तृतीय व चतुर्थच्या मुहूर्तावर आई भगवतीचा गाभारा हा झेंडूच्या पुष्पगुच्छ व झेंडूच्या हराने सजवण्यात आला होता संपूर्ण गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांनी आरास करण्यात आली होती त्यामुळे आई सप्तशृंगी चा गाभारा अतिशय मनमोहक दिसत होता.
तृतीया / चतुर्थीच्या मुहुर्तावर हजारो भाविक सप्तशृंगी माते चरणी लिन. आद्यस्वयंभू शक्तीपिठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव दि ०७/१०/२०२१ पासून सुरु झाला असून, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कोविड -१ ९ अनुषंगीक पुर्तता करुन विश्वस्त संस्थे मार्फत भाविकांना प्रतितास ९ ०० प्रमाणे ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच भाविकांनी श्री भगवतीच्या दर्शनाला येतांना मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असून, १० वर्षा खालेली व ६५ वर्षावरील वयोवृध्द भाविकांना दर्शन प्रवेश बंदी असेल. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाची पुजा केली जाते व श्री भगवतीस दुधा पासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखविला जावून दुखा पासून मुक्ती मिळते व आनंदाची प्राप्ती होते. तसेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कृष्मांडाची पुजा केली जाते. आज तृतीया / चतुर्थीच्या मुहुर्तावर दुपारी ६.३० वाजे पर्यंत ११७४१ भाविकांनी ऑनलाईन पास उपलब्ध करुन श्री भगवतीचे दर्शन घेतले. आज सकाळी श्री भगवतीची पंचामृत महापुजा मा. श्री. राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक व मा. श्री. जयसिंगराव झपाटे, सह . धर्मदाय आयुक्त, नाशिक यांनी सपत्नीक श्री भगवतीची पुजा करुन आशिर्वाद घेतले. तसेच नाशिक येथिल आमदार मा . सौ . सिमाताई हिरे व माजी महापौर श्री. अशोक मुर्तडक यांसह केंद्रीय आरोग्य मंत्री सौ . भारतीताई पवार यांनी सायंकाळी श्री भगवतीचे आशिर्वाद घेतले व विश्वस्त संस्थेच्या वतीने मा . नामदार यांचा येथोचित्त सत्कार करण्यात आला. अशी माहिती विश्वस्त संस्थेचे विश्वस्त अॅङ श्री. दिपक पाटोदकर व अॅड . श्री . ललित निकम यांनी वृत्तपत्रांना दिली .
+