सप्तशृंगी गड | मोठ्या उत्साहात फडकला आई सप्तशृंगीचा किर्ती ध्वज...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
            लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगगडावर ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते . परंपरेनुसार दुपारी चार वाजता न्यासाच्या कार्यालयात जिल्हा सत्र न्यायाधीश वर्धन पी . देसाई यांनी ध्वजाची विधीवत पूजा करून ध्वजाचे मानकरी गवळी परिवार यांच्याकडे तो सुपुर्द केला . याप्रसंगी तहसीलदार बंडू कापसे , विश्वस्त मन ज्योत पाटील , दीपक पाटोदकर , भूषण तळेकर , डॉ . देवरे तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर , भिकन वाबळे , संस्थेचे पदाधिकारी व भाविक सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . ढोल - ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करीत गावातून ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली . सप्तशृंगी देवीच्या कृपेने फक्त पाटील गवळी यांच्या घराण्यातील पुरुष या शिखराच्या सुळका चढून भगवा कीर्तिध्वज लावतो . समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे फूट उंचीवरील या सुळक्यावर दरे गावचे पाटील कोणताही आधार न घेता चढतो . सप्तशृंगगडावर कीर्ती ध्वजाची करण्यात आलेली पुजा . 
पाटील शिखरावर नवा ध्वज लावून पुजा करतात...
           पाटील ज्या शिखरावर चढतात , तो रस्ता बऱ्याच भाविकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला ; पण कोणालाही मार्ग सापडला नाही . पाटील शिखरावर पोहोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्या जागी नवा ध्वज लावून त्याची पूजा करतात . रात्री बाराच्या सुमारास ध्वज लावला जातो . शिखरावर चढण्या उतरण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात . दरेगावचे पाटील तीन ते चारच्या सुमारास खाली उतरतात . शिखरावर निशाण लागल्यानंतर भाविक या ध्वजाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागतात . त्याचप्रमाणे यात्रेची सांगतादेखील होते . संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात या परंपरेला वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते . अशी ही आगळीवेगळी पाचशे वर्षापेक्षा अधिक चालत असलेली परंपरा आहे . 
कीर्तिध्वजाचा मानकरी...
             दरवर्षी देवीच्या ध्वजाचा मानकरी पाटील मध्यरात्री सुळक्यावर चढतो कसा आणि ध्वजकाठी , ध्वजदेवीचे पातळ नारळ , आदी तीस - पस्तीस किलोंचे वजन घेऊन सर्वात उंच असलेल्या सुळक्यावर जाऊन उभा राहतो कसा हे कोडे अजून कोणाला उलगडलेले नाही . या सर्वोच्च वादी से अवघड शिखरावर सप्तश्रृंगी देवीचा वरदहस्त लाभलेला पाटील लीलया चढतो . पाटील घराण्यात ही परंपरा पाचशे वर्षापासून निर्विघ्नपणे सुरु आहे हे विशेष आहे .

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !