सप्तशृंगी गड | सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची सांगता ...

0
सप्तशृंगगडावर शतचंडी यागा...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस

         आदिमाया सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची शुक्रवारी ( ता. १५ ) विजयादशमीस शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन सांगता झाली . दसरा उत्सवही झाला . सप्तशृंगगड ग्रामस्थांतर्फे पहिली पायरी चौकात पारंपरिक पद्धतीने बोकडबळी देत पूर्णाहूती विधी करण्यात आला सप्तशृंगगडावर आदिमायेच्या शिखरावर मध्यरात्री मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयातील सदस्यांनी कीर्तीध्वज फडकविला. शुक्रवारी सकाळी कीर्तीध्वजाचे सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी दर्शन घेतले गुरुवारी ( ता. १४ ) महानवमीनिमित्त देवीमंदिर सभामंडपात दुपारी शतचंडी याग सुरू झाला होता. यजमान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक यागात आहुती दिली. पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी यज्ञविधीत सहभाग घेत मंत्रघोषात मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात यज्ञविधी केला. रात्री कोहळ्याचा बळी विधिवत पूजन करून देण्यात आला शुक्रवारी सकाळी नऊला शतचंडी यागास पूर्णाहुती, आदिमायेची पंचामृत महापूजा व महाआरतीही ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन देसाई यांनी सपत्नीक केली . सप्तशृंगीगड ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते . सकाळी गडावर घटी बसलेल्या महिला भाविकांनी कीर्तिध्वजाचे दर्शन, आदिमायेस नैवद्य देऊन बसविलेले घट विसर्जित केले . दुपारी देवीस पुरणपोळी, वरण - भात , भाजी आदी पदार्थाचा नैवद्य देऊन आरती झाली . त्यानंतर उत्साहाची सांगता झाली . दरम्यान, पाच वर्षापासून देवीमंदिर परिसरात प्रथेनुसार होणाऱ्या बोकडबळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस बंदी कायम आहे . कोरोना नियमावलींचे पालन करून भक्तांगण हॉलसमोरील होमकुंड मंडपात गुरुवारी ( ता. १४ ) ग्रामस्थांतर्फे स्वतंत्र नवचंडी याग झाला. शुक्रवारी शिवालय तलावापासून बोकड व मानकऱ्यांची परंपरेनुसार साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पहिल्या पायरीवर बोकड्याचे व मानकऱ्यांचे विधिवत पूजन करून पहिली पायरी चौकात बोकडबळी देण्यात आला. नंतर गडावर वळीचा विजयादशमी उत्सव भाविकांनी उत्साहात साजरा केला .

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !