सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर मागील गेल्या वर्षी नवरात्र उत्सव हा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थ व भाविक हे नाराज झाले होते परंतु यावर्षी प्रशासनाने नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच माळीला म्हणजेच घटस्थापनेला राज्यातील संपूर्ण मंदिरे खुली केल्याने भाविकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते पण जिल्हाअधिकारी यांच्या आदेशानुसार आई अंबेचे दर्शन घेण्याकरिता भाविकांना ऑनलाइन रजिस्टर करणे अनिवार्य करण्यात आले असल्याने अनेक भाविक शासनाच्या या नियमाचे असमर्थ करताना दिसत आहे कारण की सप्तशृंगी गड हे ग्रामीण भागात असल्याने अनेक लोक हे ऑनलाईन रजिस्टर पासून वंचित आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवरचे प्रॉब्लेम असल्याने व भाविक कांकडे स्मार्टफोन नसल्याने आई आंब्याच्या दर्शनापासून अनेक भाविक वंचित झाल्याचे दिसून आले आणि जे भाविक ऑनलाईन रजिस्टर न करता नांदुरी येथे आले होते त्यांना नांदूर येथूनच पास नसल्याने प्रशासनाकडून त्यांना ऑनलाईन रजिस्टर करण्याचा सल्ला देण्यात आला व त्यांना परत पाठवण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर पहिल्या माळेला ज्या भाविकांनी ऑनलाईन पास्ते नोंदणी केली होती अशा भाविकांनी आई आंब्याचे दर्शन घेतले सकाळी सात ते नऊच्या दरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट अध्यक्ष वर्धन पी. देसाईयांच्या हस्ते आदिमायेची पंचामृत महापूजा झाली. त्यापूर्वी सकाळी सातला नासाच्या कार्यालय देवीच्या दागिन्यांचे पूजन होऊन पुरोहितांना वर्दी दिली शासनाच्या नियमांचे पालन करून आई भगवतीच्या दागिन्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी, पुरवीत, गावकरी सह भाविक उपस्थित होते.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....