भाविकांची व ग्रामस्थांच्या गैरसोय कधी संपणार ग्रामस्थांचा सवाल...
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गेल्या दोन-तीन वर्षापासून बीएसएनएल ऑफिस मध्ये कर्मचारी नसल्यामुळे बंद आहे नुकत्याच झालेल्या माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग कळवण यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील अधिका-यांची व विश्वस्त आणि ग्रामस्थांची सप्तशृंगी गड येथे यात्रा आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शासनाचे नियमाने आई भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास सुविधा शासनाकडून आणि सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कडून करण्यात आली आहे. मात्र सप्तशृंगी गडावरील बीएसएनएल ऑफिस चा मनमानी कारभार असल्यामुळे आलेल्या भाविकांचे आई सप्तशृंगी च्या दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी ही भाविकांनी कशी करायची हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे बीएसएनएल कर्मचारी हे ठिकाणावर नसल्यामुळे भाविक भक्तांची गैरसोय आणि स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय ही कशी पूर्ण होईल असा प्रश्न ग्रामस्थांना व येणाऱ्या भाविकांना उपस्थितीत होणार आहे.
सप्तशृंगी गडावर मोजकेच आशा कंपन्या या सर्विस देत असतात पण मात्र सरकारी बीएसएनएल हे सप्तशृंगी गडावरील असल्यामुळे सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ हे बीएसएनएल वापर करते आहेत मात्र बीएसएनएलच्या दररोज होणारी गैरसोय गडावरील ग्रामस्थांना दिवसेंदिवस गैरसोय ही वाढतच चालली असल्याने गडावरील नागरिक हे बीएसएनएल ला त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे बीएसएनएल चा मनमानी कारभार व काही दिवसांपासून बंद असलेल्या ऑफिस कधी सुरू होईल याची चिंता गडावरील ग्रामस्थ करीत आहे. अनेक दिवसांपासून ऑफिस कडे बीएसएनएल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे तेथील अनेक ठिकाणी चे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे जसे की गेटवरील गंज, नेटवर्क मोरे मधील तांत्रिक बिघाड, नेट मधील तांत्रिक बिघाड, असे अनेक समस्या या सप्तशृंगी गडावरील बीएसएनएल ऑफिस च्या कार्यालयात दिसून येत आहे तरी ऑफिस ची दुरुस्ती, कर्मचारी यांची उपस्थिती, नागरिकांची गैरसोय कधी पूर्ण होईल असा सवाल ग्रामस्थांना उपस्थित झाला आहे व या संपूर्ण समस्या कधी दूर होतील व बीएसएनएलचे कर्मचारी हे ग्रामस्थांची होणारी गैरसोय ही कशी हाताळता तुझ्याकडे ग्रामस्थांचे व भाविकांचे लक्ष लागले आहे.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....