सप्तशृंगी गड | भाविक भक्तांची मनोकामना होणार पूर्ण आई सप्तशृंगीचा दरबार पुन्हा एकदा गजबजणार...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
७ तारखेपासून पुन्हा एकदा गजबजणार आई आंबे चा दरबार...
                 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड तब्बल सहा महिन्यांनंतर राज्यातील मंदिरे ७ सप्टेंबर शारदीय नवरात्रोत्सापासून उघडण्यास सरकारने परवानगी दिल्याने साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावरील ग्रामस्थांसह आदिमायेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे . आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेचे मंदिर कोविड -१ ९ च्या पार्श्वभूमीवर एक मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते तेव्हापासून मंदिर बंदच असल्यामुळे एप्रिल महिन्यातील आदिमायेचा वर्षातील प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव यात्राही रद्द करण्यात आली होती . मागील वर्षीही मार्चमध्येच कोविडच्या पहिल्या लाटेत मंदिर बंद करण्यात आली होती . त्यावेळी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव हे दोन उत्सव रद्द करण्यात आले होते . कोविडच्या दुसऱ्या लाटेत ही एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांना सलग तीन यात्रोत्सवांना मुकावे लागले होते . या कालावधीत शेकडो वर्षांची असलेली पदयात्रा , पालखी यात्रा , कावड यात्रेची परंपरा खंडित झाल्याने भाविकांच्या मनातील हूरहुर कायम होती . दरम्यान दुसरीकडे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या सप्तशृंगीगडाची सर्व अर्थव्यवस्थाही भाविक व पर्यटकावरच अवलंबून असल्याने या कालावधीत झालेल्या यात्रोत्सावात गडावर एकही भाविक येऊ न शकल्याने गडावरील सर्व अर्थचक्र थांबले होते . सुमारे तीनशेच्यावर छोटे मोठे व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असलेले कामगार व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती . दरम्यान उत्पन्न देणारे तीन महत्त्वाचे उत्सव हातातून गेले असले तरी ७ सप्टेंबरला आदिमाया सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवापासून मंदिर उघडणार असल्याने गडावरील व्यावसायिक , ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे . शासनाच्या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे . केंद्र शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड -१ ९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शक तत्वे विचारात घेता , सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल . सोशिअल डिस्टन्सनचे पालन होण्याकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करणे , भाविकांनी एकाच वेळी होणारी गर्दी टाळणे , आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तनि करुन मंदिर व्यवस्थापन , स्थानिक स्वराज्य संस्था , प्रशासनास सहकार्य भाविकांना करावे लागणार आहे 
             श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दि : 24 सप्टेंबर , 2021 रोजीच्या शासन आदेशानुसार " ब्रेक द चेन " बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत . त्याअनुषंगाने दि .07 / 10 / 2021 पासुन सप्तश्रृंग गड येथील सप्तश्रृंग निवासीनी देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे . सदर बाबत नियोजन व पूर्वतयारी करणेकामी दि .30 / 09 / 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग कळवण यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील अधिकाऱ्यांची व विश्वस्त व ग्रामस्थांची सप्तश्रृंग गड येथे बैठक घेण्यात आली . तालुक्यातील महसुल विभाग , पोलिस विभाग , आरोग्य विभाग , पंचायत समिती , ग्रामपंचायत , वनविभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग , एस - टी महामंडळ , एम.एस.ई.बी. , बी.एस.एन.एल. , इत्यादी विभागाचे अधिकाऱ्यांना त्यांचे सोपविलेले कामकाज काटेकोरपणे करण्याविषयी निर्देश देण्यात आले आहेत . 

सदर बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले .

1 ) दि .07 / 10 / 2021 ते दि .15 / 10 / 2021 या नवरात्र काळामध्ये मंदिर 24 तास उघडे राहिल . 
2 ) पास शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही . 
3 ) शासन नियमानुसार 65 वर्षावरील व्यक्ती , आजारी व्यक्ती , गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये असे आवाहन केले आहे . 
4 ) पास मिळणेसाठी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेबाबतचे प्रमाणपत्र अथवा 72 तासामधील RTPCR अथवा 24 तासामधील RAPID ANTIGEN TEST चा रिपोर्ट असणे आवश्यक आहे . 
5 ) मंदिरामध्ये प्रवेश करताना मास्क बंधनकारक आहे . 
6 ) सामाजिक अंतर ठेऊन मंदिरामध्ये दर्शनाचे नियोजन केले आहे . आणि मंदिर परिसरामध्ये कोरोनाचे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत नियोजन केले आहे . 
7 ) नवरात्र काळात नांदुरी व सप्तश्रृंग गड येथे यात्रा भरण्यास परवानगी दिली जाणार नाही . 
8 ) नांदुरी येथील खाजगी वाहनतळावर भाविकांना त्यांचे खाजगी वाहनांचे पार्कीग करावे लागेल . 
९ ) भाविकांना त्यांचे खाजगी वाहन नांदुरी येथुन सप्तश्रृंग गडावर नेता येणार नाही . 
10 ) भाविकांना नांदुरी येथुन सप्तश्रृंग गडावर जाणे येणे साठी एस - टी बसेसची सोय केलेली आहे . 
11 ) राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवेश करताना मंदिर प्रवेश पास दाखविणे अनिवार्य आहे . 
12 ) राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 50 % क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी असेल .

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !