लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर माझे गाव माझे कुटुंब या संकल्पनेतून श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत ही अनेक उपक्रम राबवत असतात तसेच यावेळेस श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतने फवारणी यंत्र हे स्वतः विकत घेऊन ग्रामस्थांना कोणताही त्रास होऊ नये व ग्रामस्थांचे सुरक्षा हीच आमची सेवा असे मानत श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायतनी दिनांक 26 पासून दर पंधरा दिवसांनी सप्तशृंगी गडावर जंतुनाशक फवारणी संकल्प केला असून फवारणी ही दर पंधरा दिवसांनी संपूर्ण गावात केली जाते व ही फवारणी करीत असताना ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार ग्रामपंचायत सदस्य हे जातीने लक्ष देऊन संपूर्ण गावात रोगराई नये जसे की डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये व आपले गाव स्वच्छ व निरोगी कसे राहील याकडे सप्तश्रुंगी ग्रामपंचायतीचे सदैव लक्ष असते.
यावेळेस सरपंच रमेश पवार, ग्रामसेवक, संदीप भाऊ बेनके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सागर वाघ, सुरेश पिसू आणि यावेळेस सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे कार्य पाहून समाधान व्यक्त केले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....