सप्तशृंगी गड | सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी घेतले घड्याळ हाती...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
            श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर आज कळवण सुरगाणा मतदार संघाचे तरुण व तडफदार असलेले आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार व सौ.जयश्री ताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्री. शांताराम सदगीर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन आपल्या गावाचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला आपल्या स्थानिक आमदार नितीन भाऊ पवार यांना साथ दिली पाहिजे नितीन भाऊ पवार यांनी सप्तशृंगी गडावर मूलभूत सोयीसुविधा व कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व तसेच अंतर्गत रस्त्यांची सुविधा करण्यासाठी वीस कोटी निधीच विकास आराखडा मंजूर केला असून लवकरच त्यास शासन स्तरावर मान्यता मिळणार आहे यापुढे अधिकाधिक निधी मंजूर करून सप्तशृंगी गडाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याने नितीन भाऊ पवार यांच्या पाठीशी तरुण युवा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे सांगितले याप्रसंगी सप्तशृंगी गड नांदुरी येथील जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस (ग्रामीण) श्री. दिपक जोरवर तसेच सी.पी.एम. (लालबावटा) पक्षाचे पदाधिकारी श्री. दिलीप बर्डे यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आमदार नितीनभाऊ पवार  यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
            आमदार नितीन भाऊ पवार हे आदिवासी बहुल भागातील आदिवासींच्या प्रश्नांची जाण ठेवत  विकासाचा ध्यास ठेवून सप्तशृंगी गडासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन सर्वांगीण विकास कामे करीत असल्याने त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची चुणूक तालुक्यातील युवा वर्ग तसेच ज्येष्ठांनी देखील ओळखुन  हातावर घड्याळ बांधत  राष्ट्रवादी चा झेंडा हातात घेतला आहे. 
            याप्रसंगी प्रवेश दिपक जोरवर, दिलीप बर्डे, सागर भूसनर, वैभव ढूमसे, वैभव जहागीरदार, शाम पंच, सुरज तिवारी, स्वप्नील पवार, भूषण गवळी, विनोद गवळी, विष्णू सावंत, योगेश कदम, बबलु गायकवाड, सचिन पाटील, गणेश कडवे, प्रसाद दीक्षित, घुमरे, आकाश तिवारी यांचेसह अनेक युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !