सप्तशृंगी गड | भर पावसात डॉ भारतीताई पवार यांनी घेतले आई सप्तशृंगीचे दर्शन...

0
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
            साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर भर मुसळधार पावसात सुद्धा डॉक्टर भारती ताई पवार या सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगी चरणी नतमस्तक होण्याकरिता व कोरोना महामारी लवकरात लवकर संपावी ही प्रार्थना करण्याकरिता डॉक्टर भारती पवार या आई सप्तशृंगी च्या दर्शनासाठी व कोरोणाचा संपूर्ण देशातून नायनाट होऊ दे अशी प्रार्थना करण्यासाठी आणि जनआशीर्वाद यात्रा निमित्त सप्तशृंगी गडावरती भेट दिली.
            राज्यातील संपूर्ण धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे डॉक्टर भारती ताई पवार यांना आई सप्तशृंगीच्या मंदिरात जाता आले नसल्यामुळे त्यांनी पहिल्या पाहिरी येथील आई सप्तशृंगीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला व प्रार्थना केली की संपूर्ण देशवासीयांना सुखी ठेव व कोणालाही कोरोना या मामारी चे संकट येऊ देऊ नको आणि मला गोरगरीब जनतेची सेवा करण्याची ताकद मला दे.
            सप्तशृंगी देवीचरणी नतमस्तक मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पवार यांनी सप्तशृंगी देवीच्या गडावर जाऊन पहिल्या पायरीचे दर्शन घेत देवीचरणी नतमस्तक झाल्या. यावेळी त्यांनी देशाला कोरोनापासून मुक्त होउदे असे साकडे घातले. केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात मोठे काम उभे केले असून, देशातील ५५ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला असल्याचे प्रतिपादन कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. पालघर ते नंदुरबार जनआशीर्वाद यात्रेनंतर डॉ. पवार या कळवण दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. ना. डॉ. पवार म्हणाल्या, देशातील आठ आदिवासी समाजातील खासदारांना मंत्रिपदाची संधी देऊन पंतप्रधानांनी आदिवासी, कष्टकऱ्यांच्या सन्मान केला आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आहे. तसेच कळवणकरांच्या कष्टांमुळेच आपण मार्गी खासदारची मंत्री झाल्याची भावना व्यक्त यावेळी केली . तसेच हास्वागत सोहळा बघण्यासाठी स्व दादासाहेब ( ए. टी. पवार ) हवे होते, असे भावुक उद्गारही त्यांनी काढले. आरोग्यच नव्हे तर सर्वच खात्यांकडे असलेली आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे डॉक्टर पवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच फेन्युकुलर रोपवे चे मॅनेजर यांच्या तर्फे सुद्धा डॉक्टर पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस सप्तशृंगी गडावरील व्यापारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा डॉक्टर भारती ताई पवार यांचा सत्कार केला.
            यावेळेस पुरोहित भूषण देशमुख, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे त्रस्टी मनज्योत पाटील, ललित निकम, भूषण तळेकर, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, प्रकाश जोशी, बंडू देशमुख, प्रकाश कडवे, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !