आई भगवती चे मंदिर उघडावे म्हणून दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
दुकाने मॉल सुरु तर मंदिरे कधी...?
सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी दिले जिल्हाधिकार्यांना निवेदन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगड देवी मंदिर व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याकारणाने व्यापारी व हातावर काम असणारे ग्रामस्थ कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . यासंदर्भात सप्तशृंगगडावरील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेत मंदिर लवकरात लवकर उघडावे यासाठी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळेस व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांच्याकडे मंदिर उघडण्यास संदर्भात विनंती केली व मंदिर बंद असल्याने व्यापाऱ्यांवरती व ग्रामस्थांवर ती अनेक संकट येत आहे ते म्हणजे महिला बचत गटांचे तगादे, बँकेच्या नोटिसा, लाईट बिलाची सक्ती व हे सर्व असताना यामध्ये पावसाळा सुरू झाला आणि या पावसाळ्या ने अजूनच सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांचे हालत केले आहे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व याच वेळेस व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बोलताना त्यांचे मनोगत मांडताना व्यापाऱ्यांनी असे म्हटले की जसे हॉटेल, मॉल्स व दुकाने कायद्याच्या नियमावलीत सुरू केले तसेच मंदिरांना सुद्धा नियमावली करून मंदिरे खुली करावी व्यापारीयांचे दुःख समजून घ्यावे अशी यावेळेस ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आणि संपूर्ण व्यापारी वर्गातर्फे करण्यात आली.
सप्तशृंगी गड येथील स्थानिक व्यापारी यांना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ असल्याने व सप्तशृंगी मातेचे मंदिर बंद असल्याने भाविक दर्शनासाठी येऊ शकत नाही. या भाविकांवर स्थानिक आदिवासी बांधव, व्यापारी व इतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून असल्याकारणाने मंदिर बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे देवीचे दर्शन मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात यावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करत सप्तशृंगीगडावरील सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, व्यावसायिक धनेश गायकवाड, आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी....